मुक्ताईनगर : बनावट सातबारा उतारा तयार करून, शेत विक्रीचे खोटे खरेदीखत नोंदवून देत फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायालयाने दिली. प्रथम वर्ग न्या. संजीव एस. सरदार यांच्या कोर्टाने मंगळवारी हा निकाल दिला.शिक्षा झालेल्यांमध्ये चार बोदवड येथील तर मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे येथील एका आरोपीचा समावेश आहे.आरोपी सुरेंद्र अवचित पालवे रा. नांदगाव ता. बोदवड, युवराज भिवा तायडे रा. बोदवड, राजू सदाशिव पाटील रा.जलचक्र ता.बोदवड, अनिल मुरलीधर तायडे रा. धामणदे ता. मुक्ताईनगर, बाजीराव सदाशिव पाटील रा. जलचक्र ता . बोदवड यांनी संगनमताने निवृत्ती जगन्नाथ पाटील रा. तळवेल ता . भुसावळ यांना पंडित संपत निकम या बनावट नावाने दुय्यम निबंधक कार्यालय येथे खोटे खरेदीखत नोंद करुन दिले. तसेच त्याला ओळख म्हणून गजू जगन निकम यांच्या मतदान कार्डावर बाजीराव सदाशिव माने याने स्वत:चा फोटो लावून झेरॉक्स काढून सदरचे बनावट दस्ताऐवज खरेदीच्या वेळी जमा करुन स्वत:ची खोटी ओळख दिली. तसेच सुरेंद्र पालवे, युवराज तायडे व राजू पाटील यांनी माळेगाव येथील शेत गट क्र . ६३/१ चा बनावट सातबारा तलाठीची सही व खोटे शिक्के वापरुन तयार केला. या कारणाने त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात निवृत्ती पाटील रा . तळवेल ता. भुसावळ यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्याने सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निलेश जाधव यांनी आठ साक्षीदार तपासून प्रभावीपणे युक्तीवाद केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर पैरवी अधिकारी म्हणून एएसआय नरसिंग चव्हाण व कॉन्स्टेबल रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले.
खोटे खरेदी खत नोंदवून फसवणूक, पाच आरोपींना दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:33 AM
बनावट सातबारा उतारा तयार करून, शेत विक्रीचे खोटे खरेदीखत नोंदवून देत फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायालयाने दिली.
ठळक मुद्देशिक्षा झालेल्यांमध्ये चार बोदवड येथील तर मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे येथील एका आरोपीचा समावेशसरकारी वकील निलेश जाधव यांनी आठ साक्षीदार तपासून केला प्रभावीपणे युक्तीवाद