जळगाव : मदत करण्याच्या बहाण्याने १३ वर्षाच्या मुलीला पळविणाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गणेश सखाराम बांगर (३२, मालेगाव, जि.वाशिम) याचे विविध कारनामे समोर येत आहेत. भिंतीचे कुंपन तयार करुन देणाऱ्या बांधकाम ठेकेदारांशी संपर्क साधून तुम्हाला सरकारी निविदा मंजूर करुन देतो अशी बतावणी करुन त्यांच्याकडून पैसे घेतो तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी दवाखान्याची फाईल दाखवून मोबाईल गहाण ठेवत असल्याचे कारनामे उघड होत आहे.त्याच्या शोधार्थ जळगाव पोलिसांचे चार पथके राज्यभर रवाना झाली आहेत. त्याच्याकडे असलेली दुचाकी (एम.एच.३७ वाय १८४७) चोरीची असून त्यावर लाल अक्षरात इंग्रजीत ‘प्रेस’ असे नाव लिहिलेले आहे. याबाबत कारंजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे.गणेश हा सध्या पोलिसांना चकवा देत असून अनेक महिला व परिचारिकांनाही त्याने गंडविलेआहे. सरकारी कार्यालयाचे बांधकाम असो कि वॉलकंपाऊंड याची निविदा मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदारांकडून तात्पुरती एक ते दोन हजार रुपयाची रक्कम घेतो त्याशिवाय पेट्रोल पंपावर दवाखान्याची फाईल दाखवून मोबाईल गहाण ठेवतो. रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी ओळख असल्याचे सांगून तेथे तुमच्या जवळच्या लोकांना कामाला लावतो असेही तो सांगत आहे. त्याची माहिती देणाºयास पोलीस अधीक्षकांनी बक्षीस जाहीर केले आहे.
निविदेच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:13 PM