जळगाव : ठिंबक नळीच्या व्यावसायिकाची २ लाख ८१ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिराग संजय शहा (रा.गणपतीनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
गणपती नगरातील चिराग शहा यांचा शेतीसाठी लागणारे ठिंबक नळीचा व्यावसाय आहे. २२ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता चालक पंकज रघुनाथ सोनवणे याला २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे २०१ ठिंबक नळीचे बंडल देवून त्याला जालना येथील प्रवीण झंवर, गोपाल लोहीया आणि रोमीत भक्कड यांच्याकडे पोहचविण्यास सांगितले होते़ दरम्यान, तेव्हापासून आजपर्यंत चालक पंकज सोनवणे याने पैसे दिले नाही. वारंवार तगादा लावूनही कोणतेही पैसे न मिळाल्याने ५ मार्च रोजी सायंकाळी चिराग शहा यांच्या फिर्यादीवरून चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.