जळगाव : ज्यांना एक वेळेचेही जेवण मिळणे शक्य नाही अशा अनाथ आजी-आजोबांसाठी नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे ‘फूड व्हॅन’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचे उद््घाटन रविवारी ब्राम्हण सभेत उत्साहात झाले.अध्यक्षस्थानी डॉ.केदार थेपडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, मनोज पाटील, स्वप्नील पाटील, राजू पाटील, अखिलेश तिलकपुरे, शिवम् वानखेडे, विजय पवार आदी उपस्थित होते.फूड व्हॅनच्या पहिल्याच दिवशी श्रुती थेपडे यांच्या वाढदिवसानिमित्त २३४ गरजंूना मोफत जेवण वाटप करण्यात आले. सुनील कुराडे व वैशाली कुराडे यांच्यातर्फे नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या विशेष मार्गदर्शन वर्गातील १५ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.विविध संस्थांचा सत्कारया वेळी राष्ट्रीय बालकामगार स्कूल क्र.१५, वर्धिष्णु फाउंडेशन, कृती फाउंडेशन, जाणीव बहुउद्धेशीय संस्था, समतोल प्रकल्प, साई मोरया, रोटी कपडा बँक(उदगीर), नि:स्वार्थ सेवा (अकोला) ,सहवास अ केयर फाउंडेशन या सामाजिक संस्थाचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.केदार थेपडे यांनी सर्व समाजसेवी संस्थानी समाजसेवेत अधिकाअधिक प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहन केले. पहिल्याच दिवशी नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या या प्रकल्पाशी १२ अन्नदाते जुळले.प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रभुदास जावळे, प्रल्हाद जावळे, मनपा क्रीडा अधिकारी किरण जावळे, धीरज जावळे, शारदा सोनवणे, निशा पवार, शकील अहमद, महेश शिंपी, रामकिशन वर्मा, चैताली बोंडे, तेजस्विनी सोनवणे, अजय चौधरी, सुलतान पटेल, मीना परदेशी, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश जावळे यांनी केले तर धनंजय सोनवणे यांनी आभार मानले.
जळगावात नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे गरजू आजी-आजोबांसाठी मोफत जेवणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:04 PM
फूड व्हॅनचे उद्घाटन
ठळक मुद्देमार्गदर्शन वर्गातील १५ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगविविध संस्थांचा सत्कार