जळगाव : स्वयंस्फूर्तीने मतदान करणाºया मतदारांची मुक्ती फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून प्रयत्न होत आहे. यामध्ये आता मुक्ती फाउंडेशनच्यावतीने मतदान करणाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये डॉक्टरांनीही पुढाकार घेतला आहे.मतदारांच्या बोटाला मतदानावेळी लावलेली शाई दाखवून मोफत वैद्यकिय सेवेचा लाभ घेता येणार आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे व या सेवेचा लाभ घ्यावे असे आवाहन मतदान जागृती कार्याचे आयकॉन मुकुंद गोसावी, डॉ.परिक्षित बाविस्कर, डॉ.वैशाली पुरी यांनी केले आहे. सोबतच दिव्यांग मतदारांनी मतदान केल्यास इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फेही सहकार्य करण्यात येऊन दिव्यांग मतदारांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले.
मतदान करणाऱ्या मतदारांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:02 PM