लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाकडी येथील शेत शिवारात गेले पंधरा दिवसांपासून बिबट्यासह दोन पिलांचा बिनधास्तपणे मुक्तसंचार सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात पाहणी केली असता, काही पगमार्क आढळून आले आहेत. मात्र, हे पगमार्क बिबट्याचे नव्हे, तर रानमांजराचे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते आहे.
त्या ठिकाणी पुन्हा कच्चा पूल तयार
जळगाव-गिरणा नदीच्या आवर्तनमुळे मंगळवारी बायपासच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल पाण्याचा वेगात वाहून गेल्यानंतर बुधवारी पुढील कामासाठी ठेकेदाराने कच्चा पूल तयार करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी या ठिकाणी पुन्हा मातीच्या भराव टाकून पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नदीमधील पाण्याचा विसर्गदेखील काहीअंशी कमी झाल्यामुळे या ठिकाणी अडकलेले दोन पोकलँड बुधवारी काढण्यात आले. दरम्यान, पुलाच्या आजूबाजूला संबंधित ठेकेदाराकडून कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्या त काही दिवस पुन्हा हे काम थांबण्याची शक्यता आहे