चाळीसगाव, जि.जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्ताने ४७ महिला रूग्णांना डॉ.प्रमोद सोनवणे बहुउद्देशीय संस्था कळमडूतर्फे साड्या वाटप करण्यात आल्या. दरम्यान, यावेळी उपस्थित महिला, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांची कर्करोग निदान तपासणी करण्यात आली.याप्रसंगी त्वचारोगतज्ज्ञ डॉ.भूषण राजपूत, डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.आशा राजपूत, डॉ.मर्दानसिंग राजपूत, डॉ.कांता राजपूत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस कमलापूरकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, पं.स. सदस्य अजय पाटील, प्रीती विष्णू चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.महिलांना सन्मान हा घरापासून देण्याची संस्कृती जोपासली तरच समाजात सदर महिलेस सन्मान मिळतो. तसेच महिलांना स्वत:च्या आरोग्यासाठी जागरूक असावे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केले.या वेळी बेटी बचाव अंतर्गत स्री भ्रूणहत्या न करण्याची व मुलगी जन्माचे स्वागत करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक एल.सी.जाधव, विठ्ठल चव्हाण, सुनंदा महाजन, विजय सोनवणे, विजय देशमुख, अशोक परदेशी, मोहन राठोड, नितीन तिरमली, शीतल सोळुंके, योगिता शिंदे, सविता परदेशी, उदयसिंग पाटील, राकेश पाटील, गटप्रवर्तक ज्योत्स्ना शेलार, चेतन मोरे आदींनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे महिला रुग्णांना विनामूल्य साडी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 7:50 PM
प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्ताने ४७ महिला रूग्णांना डॉ.प्रमोद सोनवणे बहुउद्देशीय संस्था कळमडूतर्फे साड्या वाटप करण्यात आल्या. दरम्यान, यावेळी उपस्थित महिला, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांची कर्करोग निदान तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देमहिलांसह आशा स्वयंसेविकांची कर्करोग निदान तपासणीस्त्री जन्माचे केले स्वागत