कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील सोनार समाजातर्फे २३ रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. केशव सोनार अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, कासोद्यात सोनार समाजाचे मंगल कार्यालय आकाराला येणार आहे. यासाठी जळगाव येथील उदय रामकृष्ण पातोंडेकर यांनी सहा हजार चौरस फूट जागा विनामूल्य दिली आहे.कासोदा गावात सोनार समाज मंडळ असून, ३० सभासद आहेत. त्यात २० समाजबांधव मोलमजुरी करतात. पण जे १० आहेत त्यांची समाजाप्रती तळमळ असल्याने येथे समाजाचे मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी उदय रामकृष्ण पातोंडेकर जळगाव यांनी सहा हजार चौरस फूट जागा मोफत दिली आहे, तर प्रकाश दंडगव्हाळ दोन लाख अकरा हजार रुपये, तर आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार निधीतून पाच लाख देण्याची घोषणा केली.यावेळी आमदार चिमणराव पाटील, उदय पातोंडेकर जळगाव, मुरलीधर सराफ पाचोरा, रत्ना देवरे एरंडोल, रजनी वानखेडे शिंदखेडा, जगन्नाथ सराफ पाचोरा, पारस देवपूरकर धुळे, रजनी वानखेडे जळगाव, प्रभाकर सराफ पारोळा, नितीन सोनार पारोळा, मुरलीधर सोनार चहार्डी, पुरुषोत्तम रणधीर वरणगाव, भरत वाघ मालेगाव, विजय पिंगळे धुळे, सुरेश देवरे पाचोरा, विजयानंद मोरे धुळे, नितीन सोनार पारोळा, विजय वानखेडे जळगाव, विलास मोरे एरंडोल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.विलास मोरे, आ.चिमणराव पाटील, जगन्नाथ सराफ, रजनी वानखेडे व केशव सोनार यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक वसंत दंडगव्हाळ यांनी केले.प्रभाकर सोनार, वासुदेव सोनार, हरी सोनार, रंगनाथ सोनार, राजेंद्र दगडू सोनार, विजय सोनार, राजेंद्र सोनार, वसंत सोनार, गणपती सौनार, दीपक सोनार, अशोक रणधीर, श्याम सोनार, पंढरीनाथ सोनार, अशोक दंडगव्हाळ, प्रकाश दंडगव्हाळ, अविनाश सोनार, शंभू सोनार व महिला मंडळाने परिश्रम घेतले.
कासोदा येथे सोनार समाज मंगल कार्यालयासाठी दिली विनामूल्य जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:12 PM
सोनार समाजातर्फे २३ रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देकासोदा येथे समाज संघटननरहरी महाराज पुण्यतिथी साजरी