अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात १७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांच्यावर महात्मा फुले आरोग्य योजना अथवा कोणत्याही योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगून शिबिरात सेवा देणारे सर्व डॉक्टर आणि रुग्णांना अल्पोपाहाराची सोय करून देणारे लायन्स क्लब आणि सर्व आरोग्य टीम व ग्रामीण रुग्णालयाचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, लायन्स क्लब अध्यक्ष विनोद अग्रवाल, सचिव योगेश मुंदडा, खजिनदार प्रसन्ना जैन, लिओ चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, प्रदीप जैन, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील, न.प. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील उपस्थित होते.