जळगाव : स्मशानभूमीत मोफत लाकूड पुरविण्यासंदर्भातील निर्णय मनपानेच आर्थिक स्थितीचा विचार करून घ्यावा, असे शासनातर्फे कळविण्यात आल्याने आता महासभेतच या विषयावर निर्णय होणार आहे. मनपाच्या उपविधीत तरतूद नसल्याने स्मशानभूमीत मोफत लाकूड पुरवठा करण्याची योजना प्रशासनाने रद्द केली होती. तसेच याबाबत महासभेने केलेला ठराव विखंडनासाठी पाठविला. त्यानंतर मनपाने शासनाकडे उपविधी तयार करून मंजुरीसाठी पाठविले. मात्र अद्यापही त्यास मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान शासनानेच या विषयी निर्णय मनपाने घ्यावा, असे कळविल्याने येत्या महासभेत याबाबत निर्णय होईल.
मोफत लाकडांचा चेंडू मनपाच्या कोर्टात
By admin | Published: June 16, 2015 2:46 PM