जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांविरोधात शनिवारी कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली. यात सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.भुसावळ येथील वाणिज्य विभागाचे प्रबंधक आर. के. शर्मा, सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली २५ तिकीट निरीक्षकांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली. मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक व त्यांच्या पथकाने अप अणि डाऊन मार्गावरील प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी केली. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरु होती. या तपासणीत विनातिकीट प्रवास करणे, आरक्षित डब्यांमधून प्रवास करणे आदी २६० प्रवाशांकडून १ लाख २६ हजार ३९० इतका दंड वसूल करण्यात आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगावरेल्वे स्टेशनवर शनिवारी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्टेशनच्या बाहेर व प्रत्येक फलाटांवर शस्त्रधारी रेल्वे पोलीस होते.पाठलाग करुन फुकट्या प्रवाशांना पकडलेकाही प्रवासी तिकीट निरीक्षकांना पाहताच पळ काढत होते. यावेळी ठिकठिकाणी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांचा पाठलाग करुन, तिकीट निरीक्षकांच्या ताब्यांत दिले. विशेष म्हणजे अनेकवेळा विनातिकीट प्रवासी विरुद्ध मार्गाने रुळ ओलांडून स्टेशनाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतात.
पळून जाणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पाठलाग करुन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:06 PM