धान्य वितरणाची मुभा मिळावी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध यादरम्यान स्वस्त धान्य दुकानावरून सकाळी सात ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत धान्य वितरणास परवानगी मिळावी, अशी मागणी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.
वेळ वाढवून मिळावा
जळगाव : दूध संकलन व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी जळगाव डेअरी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकाळी दहा वाजेपर्यंत खेडेगावावरून दूध येते व त्यानंतर प्रक्रिया करण्यास किमान तीन तास लागतात. त्यामुळे ही वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मनीष झवर यांनी केली आहे.
पासला मान्यता मिळावी
जळगाव : जिल्हा मोटार ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सदस्यांनी प्रवासासाठी पास दिली आहे. मात्र, त्याला मान्यता मिळालेली नाही, तरी या पासेसला मान्यता लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी संघटनेचे सहसचिव अरुण दलाल यांनी केली आहे.
विजेचा लपंडाव
जळगाव : यंदा भारनियमन होणार नाही असे महावितरणच्या वतीने सांगितले गेले असले तरी अजूनही विजेचा लपंडाव सुरू आहे. रामानंदनगर, वाघनगर, जिजाऊनगर या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.