जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:54 PM2018-07-13T14:54:21+5:302018-07-13T14:56:02+5:30

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.

In front of the Congress office bearers in Jalgaon | जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

Next
ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष सुरूचकार्यकर्ते कमी अन् नेतेच जास्तगट-तटाच्या राजकारणाचा फटका

जळगाव : कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसला मोठा इतिहास आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशनदेखील फैजपूर येथे झाले आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची मात्र जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.
जळगाव महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येत नाही. काँग्रेसने सन २००३ मध्ये २४ उमेदवार दिले होते. त्यानंतर झालेल्या २००८ च्या निवडणुकीत २६ तर सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिले होते. तिन्ही निवडणुकीत मात्र काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. या वेळी निवडणुकीत काँग्रेसकडून पदाधिकाºयांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाला. मात्र एकाही पदाधिकाºयाने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐनवेळी केवळ १७ जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आले.
जिल्हा काँग्रेसला जळगावात गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे पक्षाचा मेळावा घेण्यापासून ते पदाधिकारी नियुक्ती या सर्व प्रक्रिया पक्षश्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
एका गटाला सांभाळत असताना दुसरा गट नाराज होत असल्याने त्याचा फटका पक्षाच्या स्थितीवर होत आहे. एकसंधपणे सर्व नाते कामे करताना दिसत नाही. फक्त बाहेरील कुणी मोठा नेता काँग्रेस भवनात आल्यावर जिल्ह्याच्या कानाकोपºयातील नेते व्यासपीठावर बसण्यासाठी फक्त एकत्र येतात, त्यानंतर फिरकतही नाही.
पदाधिकाºयांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे
काँग्रेसचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी प्रदेशाध्यक्षांनी जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही गटांना प्रदेश कार्यकारिणीवर स्थान दिले. त्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डी.जी. पाटील, अ‍ॅड. ललिता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे. यासह इतर पदाधिकाºयांनी एकत्र येत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पक्ष निरीक्षकांनी टेकले हात
जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी प्रदेशस्तरावरून जिल्हा प्रभारी पाठविण्यात आले. माजी उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार भाई जगताप, आमदार विनायक देशमुख यांनी जिल्हा प्रभारी म्हणून काम पाहिले. काही प्रमाणात या नेत्यांनी शिस्त लावण्याचे कामदेखील केले. मात्र गटबाजीच्या राजकारणाने पोखरलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती सुधारण्यात जिल्हा निरीक्षकांनादेखील यश आले नाही. काँग्रेसच्या मेळाव्यात किंवा कार्यक्रमात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची व्यासपीठावर सर्वाधिक गर्दी असते.

Web Title: In front of the Congress office bearers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.