शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

इंधन दरवाढीचा फटका : मालवाहतुकीचे दर व धान्याच्या किंमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:59 AM

मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्के वाढ

जळगाव : दररोज वाढणारे इंधनाचे दर सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत असून यामुळे मालवाहतुकीचे दर, धान्याच्या किंमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे किराणा माल, वाहनांचे भाडे यात थेट वाढ करता येत नसली तरी त्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्के वाढडिझेल दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी २० दिवसांपूर्वी झालेल्या या दरवाढीनंतर आता पुन्हा लगेच दरवाढ करता येत नसल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या २० दिवसात ५ पैशांंपासून ते ८० पैशांपर्यंत वाढ होत गेल्याने डिझेलने पंचात्तरी गाठली आहे. त्यामुळे लगेच दरवाढ करता येत नसल्याने वाढीव इंधन खर्चाचा बोझा मालवाहतूकदार सहन करीत आहे. यामुळे नफ्यात कोणतीही बचत होत नसून इंधनाचा खर्च, मजुरी, हमाली यातच सर्व कमाई जात असल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले. यात वाहनांच्या कर्जाच्या हप्ते मोठे असल्याने परवडत नसले तरी वाहन उभे राहू देता येत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढमालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने धान्याच्या किंमतीवरही अप्रत्यक्षरित्या फरक पडत आहे. हळूहळू धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ होऊन २२५० ते २४०० रुपयांवर असलेल्या गव्हाच्या भावात वाढ होऊन ते २४०० ते २५०० रुपयांवर पोहचले आहेत.किराणा व्यावसायिकांना फटकाकिराणा मालाच्या वाहतुकीतही वाढ झाली असली तरी मालाची भाववाढ करता येत नसल्याने दररोज या व्यावसायिकांना फटका बसत आहे. मात्र काही दिवसात ही वाढ अटळ असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.डिझेल दरवाढीमुळे २० दिवसांपूर्वी मालवाहतुकीच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करावी लागली. डिझेलचे दर वाढतच असल्याचे आता पुन्हा लगेत भाडेवाढ करता येत नसल्याने त्याचा फटका सहन करावा लागत आहे.- पप्पू बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने धान्याच्या किंमतीवरही मोठा परिणाम होत नसला तरी थोडाफार वाढ झाली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली असली तरी किराणा मालाच्या किंमतीत एकदम वाढ करता येत नाही. त्यामुळे व्यावसायिकांनाच त्याचा फटका बसत आहे.- ललित बरडिया, उपाध्यक्ष, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फॅम).डिझेल दरवाढीने प्रवासी भाड्यातही वाढ करावी लागणार आहे. आतापासूनच प्रवाशांनी पाठ फिरवली असून त्याचेही नुकसान सहन करवे लागत आहे.- सतीश देशमुख, ट्रॅवल्स कंपनी संचालक.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपJalgaonजळगाव