शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

फुल फुलोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:36 PM

बुक शेल्फ

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी प्रमुख असलेले प्रा.डॉ. किसन पाटील यांचा ‘फुल फुलोरा’ हा काव्यसंग्रह. सर्जनशील लेखक, कवी, समीक्षक आणि संशोधक मार्गदर्शक असलेल्या प्रा.डॉ.पाटील यांची याआधी २० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. भाव विश्वातल्या भाव आणि भावनांचे प्रतिबिंब प्रा.डॉ.पाटील यांनी ‘फुल फुलोरा’मध्ये फुलवले आहे. बालपण जसे रम्य असते, तसे ते नटखटही असते. बालपणीच्या सुखाच्या आठवणी चिरंतन ठेवा असतात. आई-बाबांचे संस्कार, नात्या-गोत्याचा जिव्हाळा, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची प्रयोगशाळाच असते ते बालपण. या काव्यसंग्रहाची सुरुवातच बालपण या कवितेने झाली आहे. ‘कसं विसरेन माझं नटखट बालपण, हरिणांच्या उड्यांसवे, जगलेलं सानपण, छळतात मला आता, गोडगोड आठवणी, मनमुराद खेळलो, सारेच मित्रमैत्रिणी’ अशा काही बालपणीच्या आठवणी कवी सांगतात. याही पुढे जावून नदीकाठचे खेळणे, झाडा-फुलांशी मैत्री, निसर्गातले मस्त हिंदळणे, तळ्या-मळ्यात समरसणे, मित्रमैत्रिणींची आंगतपंगत, मोराचा पिसारा, सुगरणीचा खोपा, बैलगाडीतली सफर, मामाच्या गावच्या आठवणी हे सारे काही बालविश्वाचे फुलणे असते. भावविश्वातले रमणे असते. यात बालकांना भावणाºया वेगवेगळ्या अशा ४६ कविता आहेत. त्यात आईतला देव, माय मोठा मी होईन, माझी ताई, आबांचे व्यायाम, नाव आहे माझं ढोम्या, मामाचा गाव, स्वप्नातल्या पºया, माझ्या लाडक्या बाहुल्या, झाडाचं रडगाणं, अशी मजा पावसाची, झडीचा पाऊस, चांदोबाशी कट्टी फू, नंदीबैल, सण आला हा पोळ्याचा, होळी अशा काही कविता लक्ष वेधून घेतात. त्याला साजेशी सुंदर चित्रेही कवितांसोबत रेखाटली आहेत. तीही मनाला भावतात.कवी : प्रा.डॉ.किसन पाटील, प्रकाशक : अथर्व प्रकाशन, पृष्ठे : ४८, मूल्य १०० रुपये.- रवींद्र मोराणकर

टॅग्स :Jalgaonजळगाव