चोपडा : वैजापूर येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी किंमत रु. ६७ लाख व देवझिरी येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाची दुरुस्ती करण्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
विकासकामांचे भूमिपूजन वैजापूर देवझिरी शासकीय आश्रमशाळा येथे करण्यात आले. यानंतर आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी बांधवांना देण्यात येणाऱ्या खावटी अनुदानाचे साहित्य वाटप करण्यात आले. यात २ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत व २ हजार रुपये किमतीच्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले कह, चोपडा तालुक्यात खावटी अनुदानाचा लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण भागाचा मोठा प्रमाणात सर्वेक्षण केले. त्यात जळगाव जिल्ह्यात ६०,००० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यात चोपडा तालुक्यातील सर्वाधिक १०६२४ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, माजी उपसभापती एम.व्ही. पाटील, ए.के. गंभीर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, तालुका संघटक सुकलाल कोळी, गणेश पाटील, गाजूदादा पावरा, प्रताप पावरा, पंडित कोळी, परशुराम पावरा, दत्ता शिंदे, मुकेश पावरा, नायजाबाई बारेला, भागदाबाई बारेला, बहादूर बारेला, मोहनाबाई बारेला, धर्मा भिल, मोहनाबाई कोकणी, रमेश बारेला, सुरेश बारेला, गोविंदा कोकणी, शिवदास भिल, लक्ष्मीबाई कोकणी, बाळू पावरा, रायसिंग बारेला, नितीन कोळी आदी उपस्थित होते.