नीलेश यांना शनिवारी लडाख क्षेत्रात वीरमरण आले. नीलेश हे लेह लडाख येथे सैन्यदलात होते. शहरातील चौकांमध्ये शहीद नीलेश सोनवणे यांची बॅनर लावण्यात आली आहेत.
नीलेश यांचे पार्थिव सोमवारी लेहवरून दिल्ली येथे दुपारी २ वाजता पोहोचेल. तिथून ५.३० वाजता औरंगाबादसाठी निघून औरंगाबाद येथून रात्री भडगाव येथे पोहोचेल. यानंतर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर अनुरथ वाकडे यांनी दिली. मुंबईत पोलीस असलेले त्यांचे दोघे भाऊ भडगाव येथे पोहोचले आहेत.
नीलशे यांच्या वीर मरणाची शनिवारी माहिती मिळताच भडगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आदींनी नीलेश यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
खान्देश रक्षक ग्रुपचे पदाधिकारी सहकार्यासाठी भडगाव येथे घरी थांबून आहेत. यात भडगाव येथील तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष खंडेराव पाटील, चाळीसगावचे तालुकाध्यक्ष पी. ए. पाटील, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, कार्याध्यक्ष गणेश बाविस्कर, भैयासाहेब देवरे, रूपेश पाटील, समाधान पाटील, कार्याध्यक्ष इकबाल खाटीक, सोनू केदार, अतुल पाटील, सुभेदार राहुल पाटील, धनराज केदार, दिनेश वाघ, प्रमोद पाटील, दिनेश पाटील, भाजपचे शैलेश पाटील, पो.कॉ. लक्ष्मण पाटील यांच्यासह नागरिक थांबून होते.
फोटो ओळी:
भडगाव येथील शहीद नीलेश सोनवणे यांचे घर.