आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - अंगणवाड्यांमधील बुरशीयुक्त शेवयाप्रकरणातील धुळे येथील पुरवठादार महिला सहकारी गट हा भाजपा पदाधिकाऱ्याशी संबंधित असून हे प्रकरण ही शालेय पोषण आहार व बोगस अपंग युनिट प्रकरणाप्रमाणे गुंडाळले जाईल, अशी शंका जिल्हा परिषद वर्तुळात व्यक्त होवू लागली आहे. दरम्यान पाचोरा पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत जि. प. प्रशासनाने पत्र देवूनही पोलिसांनी तांत्रिक अडचण दाखविल्याने या शंकेला बळ मिळाले आहे.पोलीस म्हणतात...गुन्हा दाखल कसा करायचा?पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील अंगणवाडीमध्ये या बुरशीयुक्त शेवायांची ३६ पाकिटे आढळली होती. याबाबतची तक्रार काही पाकिटांसह शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीत ३ मे रोजी मांडली होती. यांनंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना ४ मे रोजी पाचोरा तालुका महिला व बालविकास प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्रही पोलिसांना दिले मात्र माल खराब आला व तो संबंधित ठेकेदाराने बदलून दिला. यात कोणासही हानी झाली नाही की, नुकसान झाले नाही.... यामुळे गुन्हा दाखल कसा करायचा? असा प्रश्न पोलिसांना पडला असल्याचे जि. प. कडून सांगण्यात आले.इतर प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणाची लागतेय ‘वाट’जिल्हा परिषदेत यापूर्वी शालेय पोषण आहार प्रकरणात मोठा कालावधी लोटूनही काहीच झाले नाही. याचबरोबर अपंग युनीट मधील बोगस नियुक्ती याद्या आदी प्रकरणही थंड बस्त्यात पडलेले आहे. मोठी ओरड झाल्यावर अपंग युनीट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष चौकशी समिती) मार्फत चौकशीची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली मात्र महिना उलटूनही एसआयटी आली नाही.हलगर्जीपणाबद्दल काय?पाचोरा तालुक्यातून जप्त केलेल्या पाकिटातील बुरशीयुक्त शेवयांचा नमुना तपासणीसाठी पाठविला आहे. रिपोर्ट आल्यावर संबंधितांकडून पाकिटांच्या किमतीचा दंड वसूल केला जाणार आहे. मात्र एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून पुरवठादारांकडून खराब माल पाठविला गेला म्हणजे हलगर्जीपणा झाला हे नक्की. मात्र यात मुलांच्या आरोग्यास हानी पोहचली असती तर ? याच दृष्टीकोणातून पोलीसही गंभीरतेने का पाहत नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.अंगणवाड्यांची तपासणी सुरुस्थायी समिती सभेत ठराव झाल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात एकूण १५ अंगणवाड्यांमधील आहाराची रँडम तपासणी करायची असून ७ मे रोजी ही तपासणी सुरु झाली आहे. याचा अहवाल २ दिवसात मागविण्यात आला आहे. दरम्यान अंगणवाडी सेविका या ठरलेल्या शेड्यूलनुसार सध्या सुटीवर असल्याने मदतनीस या त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तपासणी करणाºयांना कोणतेही रेकॉर्ड पाहायला मिळणार नाही. गंभीरतेने दखल घेतली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.‘त्या’ गटाकडे जिल्हाभराचा ठेका... पूर्वी पोषण आहाराचा हा ठेका जिल्ह्यातील तीन- चार गटांना दिला जात होता. मात्र गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण जळगाव जिल्ह्याचाच नव्हे तर इतर चार जिल्ह्यांचा ठेका हा राज्यपातळीवरुन धुळे येथील महाराष्ट्र महिला सहकारी गटास (अवधान, एमआयडीसी) दिला आहे. हा गट भाजपाच्या एका पदाधिकाºयाशी संबंधित असल्याने सत्ताधारी पदाधिकारी असल्याने हे प्रकरण गुंडाळले जाईल, अशी जि.प. वर्तुळात चर्चा आहे.
जळगाव जि.प.तील गोलमाल, बुरशीयुक्ती शेवयाही अपंग युनिटच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:07 PM
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
ठळक मुद्देपोलीस म्हणतात...गुन्हा दाखल कसा करायचा?इतर प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणाची लागतेय ‘वाट’