जळगाव : जिल्ह्यातील राष्टÑवादीतून काही बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेशाची शक्यता वर्तविली जात आहे.यात माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव याबाबत आघाडीवर आहे. सध्यातरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व स्वत: देवकरांनी याबाबत इन्कार केला आहे. सेना-भाजप युतीच्या भवितव्यावरच जिल्ह्यातील पक्षप्रवेशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.भाजपातील मेगा भरती बंद झाल्याचे सांगितले जात असले तरीही भाजपाकडून विरोधी पक्ष शक्यतेवढे कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. तर राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्षातील इच्छुकही भाजपची वाट धरत आहेत. जिल्ह्यातही असेच चित्र असले तरीही जळगाव जिल्हा भाजप-सेनेचा बालेकिल्ला असल्याने विरोधकांना प्रवेश देऊन संधी कुठे द्यायची असा प्रश्न भाजपसमोर आहे. सेनेशी युती तुटली तर मात्र जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मनिष जैन, देवकरांनी घेतली गिरीष महाजनांची भेटराष्टÑवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व माजी आमदार मनिष जैन यांनी गुरूवारी मुंबईत जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. याबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र पक्षप्रवेशाचा विषय नव्हता, त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांचा विषय होता, असे सांगत या विषयावर बोलणे टाळले. तर देवकरांनीही विकास कामांचा विषय असल्याचे सांगत पक्षप्रवेशाचा विषय नसल्याचे सांगितले. तर मनिष जैन यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.युती न झाल्यास पाचोऱ्यातही धक्काभाजप-सेना युती न झाल्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी मतभेद असलेल्या सेनेचे आमदार किशोर पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी राष्टÑवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांना भाजपात आणण्याचीही रणनिती आखली जात असल्याचे समजते.चाळीसगाव व जळगाव ग्रामीणसाठी प्रयत्नमिळालेल्या माहितीनुसार गुलाबराव देवकर व गिरीश महाजन यांची काल व यापूर्वीही एकदा अशी दोन वेळा बैठक झाली आहे. युती कायम राहिली तर देवकरयांना चाळीसगावमधून उमेदवारी देण्याचा विचार आहे. मात्र चाळीसगावातून भाजपातीलच अनेक इच्छुक असल्याने अडचणी आहेत. युती न झाल्यास देवकर त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातूनच लढतील, असे सांगितले जात आहे. याबाबत देवकरांनी मात्र स्पष्ट शब्दात इन्कार केला असून राष्टÑवादीकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान मुख्यमंत्री ८ व ९ आॅगस्ट रोजी जिल्हा दौºयावर असून त्यावेळी याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.भाजपात प्रवेशासाठी जिल्ह्यातही अनेक जण इच्छुक आहेत. मात्र जिल्ह्यातील भाजप-सेनेचे उमेदवार ठरलेले आहेत. ते सक्षमही आहेत. त्यामुळे राष्टÑवादी किंवा काँग्रेसमधून कुणाला प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी कुठे देणार? हा प्रश्नही आहेच. देवकरांची भेट ही मतदार संघातील विकास कामांबाबत झाली. पक्षप्रवेशाचा विषय नव्हता.-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री.
युतीच्या भवितव्यावर जळगाव जिल्ह्यातील पक्षप्रवेशाचे गणित अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:01 PM