फैजपूर : न्हावी, ता.यावल येथील बसस्थानकाजवळील गणेश मंडळाच्या पाठीमागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर फैजपूर पोलिसांनी धाड टाकत आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून जुगाराचे साहित्य व १२ हजार ८६५ रुपये हस्तगत केले.ही कारवाई सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोहिदास ठोंबरे, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, विजय पाचपोळ, हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील, सूरदास, पोलीस कॉन्स्टेबल वाहेद तडवी यांनी केली.न्हावी येथील बसस्थानकाजवळील एका गणेश मंडळाच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकत जुगार खेळणाºया आठ जणांना ताब्यात घेतले. त्यात गिरीश शंकर लढे, लोकेश यशवंत चोपडे, हितेश यशवंत चोपडे, अनिल मुरलीधर चोपडे, उल्हास विलास चोपडे, प्रीतेश नरेंद्र पाटील, प्रवीण काशीराम इंगळे, चेतन ललित झोपे यांचा समावेश आहे. याप्रकरणी जुगाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि प्रकाश वानखेडे व सहकारी करीत आहे.
न्हावी येथे जुगारावर धाड , आठ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 16:09 IST