लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गंगाधर कला मंडळातर्फे बालगंधर्व यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने या वर्षीही ऑनलाईन विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात नाट्यसंगितांची मैफील रंगली होती. सुरुवातीला 'संगीत शाकुंतल'मधील नांदी स्वरमयी देशमुख आणि स्वानंद देशमुख यांनी सादर केली.
मयुरी हरिमक, श्रुती वैद्य, मेघमाला गाडे, यांनी नाट्यगितांचे सादीकरण केले. मैफिलीचा शेवट वरूण नेवे याने 'बालगंधर्व' चित्रपटातील 'चिन्मया सकल हृदया' या भैरवीने केला. नाट्यगीतांसाठी स्वाती देशमुख, दुष्यंत जोशी, केदार गोखले (मंबई ) नीळकंठ कासार, मिलिंद देशमुख, प्रसाद सुवर्णपाठकी, मकरंद खरवंडीकर, (नगर) यांनी साथ दिली. संकल्पना मानिनी तपकिरे, निवेदन वरदा देशमुख, लेखन विशाखा देशमुख, संकलन प्रणव तपकिरे यांनी केले. कार्यक्रमासाठी धनश्री खरवंडीकर, सुषमा पदके यांनी सहकार्य केले.