चोपडा, जि.जळगाव : म.गांधी शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेली शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी व कौतुकास्पद आहे. या संस्थेतून अनेक गुणवान विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे. या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी भाग्यवंत आहेत. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षण संस्थांनी शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेऊन योग्य उपाययोजना केल्यास महाविद्यालयाच्या विकासात आणखी भर पडेल, असे मत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.सतीश देशपांडे यांनी व्यक्त केले. ते १३ रोजी समारोपीय कलामहोत्सव कार्यक्रमात बोलत होते.संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद-घाटन कै.शरचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उमविचे व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप रामू पाटील, डॉ.डी.पी.पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी दिलीप रामू पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, गायन, रांगोळी, चित्रकला, पाककला, व्यंगचित्र, हास्य काव्य, निबंध, आनंद मेळावा इत्यादी स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभानंतर कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील कला मंडळप्रमुख डॉ.हरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बसविलेली तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मकरंद चौधरी व नितीन पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रंग बावरी' या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. या एकांकिकेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली भूमिका व अभिनय याचे कौतुक केले. सूत्रसंचालन संदीप बी.पाटील यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या विविध विद्या शाखांमधील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म.गांधी शिक्षण मंडळाने अनेक गुणवान विद्यार्थी घडविले : देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:46 PM
म.गांधी शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेली शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी व कौतुकास्पद आहे. या संस्थेतून अनेक गुणवान विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे.
ठळक मुद्देम.गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ'रंग बावरी' या एकांकिकेचे सादरीकरण