जळगाव- गांधी नावाचे रसायन संपूर्ण जगाला भुरळ घालत आहे. त्याग, सेवा, समर्पण आणि मानव एकता यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि कर्तुत्वाचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मू़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले़मूळजी जेठा महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बापू अभिवादन व स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी कार्यक्रमात काही प्रेरणादायी गीतांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत केसीईचे शैक्षणिक संचालक डॉ.डी.जी.हुंडीवाले, मू.जे.चे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. संजय भारंबे अन्य प्राध्यापक गण, रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी संपूर्ण मू.जे.महाविद्यालाय्च्या परिसरामध्ये स्वच्छता केली.कार्यक्रमाच्या आरंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला डॉ.उदय कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या संचालिका डॉ.गौरी राणे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश महाले, प्रा.दिलवरसिंग वसावे, डॉ. पूजा पांडे आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा.विजय लोहार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले.
गांधी विचार मानवतेच्या कल्याणासाठी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 3:38 PM