विजयकुमार सैतवालजळगाव : देशभरामध्ये निर्माण झालेल्या इंधन दरवाढीच्या विघ्नात आता फुलेही मागे राहिले नाहीत. गणेशोत्सवामध्ये फुलांची मागणी प्रचंड वाढल्याने या सण-उत्सवाच्या काळात विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे. ३०० ते ४०० रुपये शेकडा मिळणारा गुलाब आता ७०० ते ८०० रुपयांवर पोहचला आहे. गुलाबसह निशिगंधा, शेवंती या फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने त्यांचेही भाव अनुक्रमे ९०० ते ११०० रुपये व ४०० ते ५०० रुपये प्रती किलो झाले आहेत.सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे कारण पुढे करीत अनेक वस्तुंचे भाव वाढविण्यात आले आहेत. विघ्नहर्ता गणरायाचे १३ सप्टेंबरला व १५ सप्टेंबरला घरोघरी गौरींचे आगमन झाले. सण, उत्सावाच्या पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या फुलांचे भाव यामुळे तेजीत आहे.मागणी वाढलीगणेशोत्सव व गौरींच्या आगमनामुळे फुलांची मागणीही दुप्पट झाली आहे. पूर्वी १५ ते १७ हजार फुलांची विक्री होत असलेल्या गुलाबाच्या फुलांची संख्या २५ ते ३० हजारावर पोहचली आहे. ५० ते ६० किलो विक्री होणाऱ्या निशिगंधाच्या फुलांची विक्री आता १०० ते १२० किलोवर पोहचली आहे. शेवंती १०० ते ११० किलोवरून २०० किलो दररोज विक्री होत असून झेंडुच्या एक टन फुलांची दररोज विक्री होत आहे.मागील आठवड्यात मिळणा-या एक किलो फुलांसाठी लागणारे पैसे आता अर्धा किलो फुलासाठी मोजावे लागत आहेत. १० व ११ सप्टेंबरला फुलांच्या भावामध्ये मोठी चढ-उतार झाला. मंगळवारपर्यंत मिळणाºया फुलांचे प्रतिकिलोचे दर बुधवारपासून दुप्पटीने वाढले आहेत.शेवंतीच्या फुलांचे भाव मागील आठवड्यात २०० ते २५० रुपये प्रतिकिलो होते. ते आता ४०० ते ५०० रुपये प्रती किलो झाले आहेत. निशिगंधाच्या फुलांचे भाव ४५० ते ५५० रुपयांवरून ९०० ते ११०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. गुलाबाच्या फुलांचे भाव ३०० ते ४०० रुपयांवरून ७०० ते ८०० रुपयांवर पोहचले आहे. आस्टरच्या फुलाचेही भाव १५० ते २०० रुपयांवरून ३०० ते ४०० रुपये प्रति किलो झाले आहेत. लिली बंडल ३५ ते ४० रुपयांवरून ७० ते ८० रुपयांवर गेले आहे.झेंडुचा दिलासाझेंडुच्या फुलाच्याही भावात वाढ झाली आहे. मात्र ती थेट दुप्पट नसल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे. ६० ते ७० रुपये असलेल्या झेंडुचे भाव ९० ते १०० प्रती किलो झाले आहेत.स्थानिक फुलांसह मुंबई, पुण्यातून आवकजळगावात तालुक्यातील शिरसोलीसह धरणगाव तालुक्यातून फुलांची आवक तर आहेच सोबतच मुंबई, पुणे, कन्नड या भागातूनही फुलांची आवक होत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
सण उत्सवाच्यात फुलांच्या मागणीसह दरात वाढ झाली आहे. गणपतीसह गौरी पूजनापाठोपाठ समोर येणाºया सण उत्सवामध्ये अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे.- मंगला बारी, फुल विक्रेत्या, जळगाव