जळगाव : शहरातील गणेश कॉलनी चौकात रात्री ९ वाजेपर्यंत चांगलीच गर्दी होती. येथे चौकात असलेल्या एका डेअरीच्या आडोशाने युवक उभे होते. तसेच मुख्य रस्त्यावरदेखील अनेक जण विनाकारण भटकंती करताना दिसून येत होते. या ठिकाणी पुढच्याच चौकात पोलीस बंदोबस्त होता. मात्र पोलिसांनीदेखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
फांद्या उचला
जळगाव : गंधर्व कॉलनी, गणेश कॉलनी या भागात काही दिवसांपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटल्या आहेत. या फांद्या छाटल्यावर तशाच रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. मात्र अजूनही या फांद्या मनपाच्या आरोग्य पथकाने उचललेल्या नाही. या फांद्या तत्काळ उचलून न्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
रायसोनी नगरात मातीचेच रस्ते
जळगाव : रायसोनी नगर परिसरात मातीचेच रस्ते आहेत. बहुतेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या पावसाळ्याच्या आधी हे रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून या भागात वस्ती वाढत आहे. मात्र अद्याप येथे नागरी सुविधांचा अभाव आहे.