गणेश कॉम्प्लेक्सच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून कोणीतरी लोखंडी टपऱ्या आणून ठेवल्या आहेत. ही जागा कॉम्प्लेक्सच्या मालकीची असून, कॉम्प्लेक्सचे मालक शेखर बजाज यांनी नियमानुसार ती सोडली आहे. ही जागा वाहनांच्या पार्किंगसाठी असून, त्याच जागेवर टपऱ्या ठेवल्यामुळे कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांसह ग्राहकांना त्यांची वाहने लावण्यासाठी जागाच राहिलेली नाही.
या प्रकाराबद्दल कॉम्प्लेक्समधील गाळाधारकांकडे तीव्र संताप व्यक्त होत आहे. अगोदरच कॉम्प्लेक्समध्ये खेळती हवा राहण्यासाठीच्या जागांवरच गाळे बांधले आहेत. या संदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा कॉम्प्लेक्सच्या आवारातच कोणीतरी टपऱ्या आणून ठेवल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्सच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
या प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन हे अतिक्रमण तातडीने काढावे, अशी मागणी होत आहे.
===Photopath===
280621\28jal_15_28062021_12.jpg
===Caption===
चाळीसगावातील गणेश कॉम्प्लेक्स अतिक्रमणाच्या विळख्यात