इतर खासगी श्री. गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केलेली आहे.
१९ रोजी रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री. गणरायाचे विसर्जन शांततेत, भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
श्री. गणेश विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भडगाव नगर परिषद मार्फत श्री. गणेश मूर्ती अर्पण, व ५ संकलन केंद्र उभारण्यात आलेले होते. यात भडगाव गिरणा नदी पंप हाऊस वाक रस्ता, तळणी परिसर, यशवंत नगर मारोती मंदिर, शनि मंदिर व श्री. स्वामी समर्थ केंद्र परिसर, पेठ मारोती मंदिर आदि जवळच्या मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती संकलीत करण्यात आल्या. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ३४ पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तालुक्यात गिरणा नदी व तितुर नदीच्या पाण्यात छोट्या मंडळांनी श्री. गणेशाचे विसर्जन केले.