जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमधे यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात गेल्या तीन वर्षांची परंपरा जपत शाळेमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली़ यामध्ये हर्षल बागुल व देवेश वाणी या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे़यंदा गणेशोत्सव सुरू होण्याआधी कला शिक्षकांनी गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणारी व्हिडीओ क्लिप तयार करून ती क्लिप विद्यार्थ्यांना देण्यात आली. या व्हिडिओ क्लिप च्या आधारे गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि शाडू माती पासून चिमुकल्या हातांनी सुंदर गणेश मूर्ती घडविल्या. विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे प्रथम, द्वितीय ,तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड करण्यात आली. याचे परीक्षण कला शिक्षक दत्तात्रय गंधे आणि नितीन सोनवणे यांनी केले.असा आहे स्पर्धेचा निकालशाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचा निकाल. ही स्पर्धा पाचते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक हर्षल बागुल याने पटकाविला़ द्वितीय रोहीत पाटील, तृतीय आदित्य गंधे, उत्तेजनार्थ धिरेन चौधरी, संहिता जोशी ठरला़तसेच आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक देवेश वाणी याने पटकाविला़ द्वितीय मानसी आठवले, तृतीय सुमित माळी, उत्तेजनार्थ आदित्य पाटील, प्रांजल पाटील ठरली़
विवेकानंद शाळेत गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:24 PM