शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

मराठी सारस्वतांची पावन गंगोत्री : लीळाचरित्र

By admin | Published: June 03, 2017 2:56 PM

‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील आद्य चरित्रकोश आहे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 - आचार्य मुरारीमल्ल व्यास हे नाव महानुभाव संतांच्या मांदियाळीत आणि मराठी संत परंपरेत विख्यात आहे. त्यांनी ‘लीळाचरित्र’ ग्रंथाचे चतुर्थ संशोधन केले. ‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील आद्य चरित्रकोश आहे, आदि ग्रंथ आहे. मराठी सारस्वताची ही पावन गंगोत्री आहे. व्यास हे मुळचे खानदेशचे. त्यांच्या वडिलांचे नाव भाईदास. त्यांना एक वडीलभाऊही होता. भाईदास हे गडावरचे मोकाशी होते. त्यांचे बोढारागड येथे वास्तव्य होते. संन्यास ग्रहण केल्यावर त्यांचे नाव झाले भामोबास. त्यांचे गुरू चाहेबा विद्वांस. हे मुरारिमल्लांचेही गुरू होते. येलेराजाकडून ते पैठणला आले. तेथे शास्त्राध्यनाला बहर आला. त्यांनी ‘दानस्थळ प्रमेय’ नामक ग्रंथ लिहिला. ‘मूर्तिज्ञान प्रमेय’ हा त्यांचा दुसरा मोलाचा ग्रंथ होय. व्यास हे मोठे धर्मपंडित आणि विद्वान सत्पुरुष होते. त्यांच्या ‘वृद्धाचार’ या ग्रंथातून त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा उल्लेख आढळतो. त्यात प्रामुख्याने उद्धरण प्रमेय. निर्वचन प्रमेय, असतिपरि प्रमेय, साध्यपट, काकुस्थळ, रजस्तमाची कारणे दोनि केली, पैठण वर्णन, महावाक्य प्रमेय, विद्यासार, संसरण, कल्पद्रुमाची असतिपरि, माळेकराचा दृष्टांत, वर्तेविहार, विदेह प्रबोध, ज्ञानचंद्रिका गद्य, अर्थ वचनाचिया तीर्थ मालिका, महावाक्य प्रमेय, दृष्टांताची टीका, ज्ञान चंद्रिका गद्य, झोळीयेचा गुढा, युगधर्म प्रमेय, विद्यामार्ग प्रमेय, भागवत एकादश टीका, भगवद्गीता टीका, तीन स्थळांची लापिका, वचनरूप दृष्टांत, सरोळे, ऐश्वर्याचा बंध, मूळ संसरण, माहुर असतिपरि, स्मरण बंध, पूर्वी प्रकरणाचे बंध, धाकुटे मूर्ति ज्ञान, धाकुटी प्रसाद सेवा, ज्ञान भास्कर टीका, बल्होपोथी, लीळाचरित्राची शोधनी, स्मृती आदिंचे शाोधन, अन्वस्थाची परी अशा किमान बेचाळीस ग्रंथांचा उल्लेख येतो. त्यांच्या गर्भाष्टके, भगवद्गीता टीका, धाकुटे मूर्तिज्ञान, प्रसाद सेवा या ग्रंथांचे यांनी संशोधन केले. त्यांनी महाराष्ट्रभर यात्रा केल्यात. खानदेशात विरवाडे येथे आले. शके 1520 च्या सुमारस भडगाव येथे आले. शके 1527 साली मुरारिमल्ल व्यास देवदर्शनास गेले. त्यांचा अंत्यसंस्कार ऋद्धिपुर येथे संपन्न झाला. मुरारिमल्लांच्या एकवीस शिष्यांनी संन्यास घेतला. गोपदास, कृष्णदास, गोविंदराज हे त्यांचे प्रमुख शिष्योत्तम होत.या परंपरेतल्या सारस्वतांमध्ये महानुभाव कवी ‘ऋद्धिपुरवर्णन’ कार श्रीनारायण व्यास बहाळ, लोणखेडय़ाचा ‘तीर्थ मालिका’ कर्ता महानुभाव कवी श्रीशारंगधर, ‘ज्ञानसागर’ ग्रंथाचा कर्ता हरताळेचा श्रीविप्रनारायण, शहादा येथील श्रीओंकारदादा नागराज महानुभव पंथाचे एक श्रेष्ठ साहित्यिक आणि संशोधक या नात्याने मान्यता पावले आहेत. त्यांनी लिहिलेला ‘श्रीचक्रधर सूत्र सिद्धांत’ आणि ‘श्रीमद्भगवद्गीता व मानव धर्म’ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांची शैली सूत्रबद्ध आणि विवेचन रसाळ आहे. त्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीने ज्ञानगंगा प्रवाहीत केली आहे.सप्त प्रासादिक काव्य ग्रंथातील ऋद्धिपुर वर्णन काव्याचे रचनाकार बहाळ तालुका चाळीसगाव येथील श्रीनारोव्यास बहाळिये. त्यांच्या काव्यशक्तिाचा मोठा मनोरम विलास दिसून येतो. त्यांच्या व्युत्पन्न मतिचाही साक्षात्कार घडतो. कविचे सारे अंतर्विश्वच या काव्याच्या रुपाने प्रकटले आहे. सहाशे पंचेचाळीस ओव्यांचा हा काव्यग्रंथ शीेर्षकामुळे क्षेत्र वर्णन असावे असे वाटते पण सह्याद्री वर्णनात श्री दत्तात्रेय प्रभुंच्या निमित्ताने सह्याद्रीचे वर्णन येते. श्री गोविंदप्रभुंच्या निमित्ताने हे काव्य रचले गेले. कविच्या श्रद्धा आणि भक्तिची ही काव्यात्म प्रदक्षिणा सुंदर आहे.एकदा श्रीचक्रधर स्वामी चांगदेव मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराशी उभे होते. याच तालुक्यातील चिंचखेड या पूर्णाकाठच्या गावचे श्रीरामदेव आपल्या शिष्यांसह भजनांचे गान करत मंदिराकडे येत होते. श्री चक्रधर स्वामींचे दर्शन होताच ते वेगाने धावत पुढे आले. श्री चक्रधर स्वामी वेणूवादक गोपाळकृष्णाच्या रुपात त्रिभंगी मुद्रेत उभे ठाकले. या भावपूर्ण क्षणांची नोंद घेणारे कवी श्रीरामदेव होत. महानुभाव पंथातल्या अनेक कविंनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ काव्य ग्रंथाची रचना केली आहे.खानदेशातील महानुभाव संत परंपरेत अनेक नावांची चर्चा करता येते. अनेक लोकांनी दीक्षा घेऊन या पंथाचे शिखरपद भूषविले आहे. आमAायपदी विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. या संदर्भात फैजपूर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्रथम प्राचार्य कैवल्यवासी श्रीमुरलीधर शास्त्री यांचा नामोल्लेख आवश्यक आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील कौठळ येथील गद्य-पद्य लेखक श्रीविद्याधर बाबा व सध्या जाधववाडी येथील श्रीमोठेबाबा यांनी विद्याथ्र्याच्या एका पिढीचे वैचारिक पोषण केले आहे.समशेरपूर येथील सुनील दादा  भोजने यांना श्रीसारंगधर व्यास भोजने ही प्रतिष्ठा नुकतीच प्रदान केली गेली. आचार्य  सारंगधर व्यास भोजने ही ज्ञान परंपरा आहे. सेवा परंपरा आहे. धर्मपीठाच्या आ™ोवरून एक नवा मनु उगवला. नवा संकल्प जागला. महंत बुवा पातुरकर आणि सर्व आदरणीय महंत जनांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा नुकताच पार पडला. जय-विजय, हिरण्याक्ष-रिण्यकशिप्य, रावण-कुंभकर्ण आणि शिशुपाल-वक्रदंत या परंपरेतला  वक्रदंत हाच शल्य आहे. नवरस नारायणांचा गाजलेला ग्रंथ ‘शल्य पर्व’ आहे. हा काव्यात्म ग्रंथ प्रासादिक शैलीतले मनोज्ञ अवतरण आहे.- प्रा.डॉ. विश्वास पाटील