जळगाव: श्रीराम मंदिर संस्थानतर्फे गेल्या १४ वर्षांची परंपरा कायम राखत रविवारी, सकाळी गावगुढी उभारण्यात आली. तत्पूर्वी गायत्री मंदिरापासून सुरू झालेल्या नववर्ष स्वागतयात्रेतून (शोभायात्रा) ही गुढी गावभर मिरवण्यात आली. या स्वागतयात्रेत विविध धार्मिक, सामाजिक संघटना, मंडळे सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, त्यावर नृत्य करणारे युवक तसेच विविध ऐतिहासिक महिला, पुरूषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले मुले-मुली यामुळे या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.गायत्री मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभविसजनजीनगरातील गायत्री मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरत करून सकाळी ७.३० वाजता या शोभायात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर नवीपेठे, महात्मा गांधी मार्ग, बळीरामपेठ, सराफबाजार आदी भागातून ही शोभायात्रा नेऊन जुने जळगावातील श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. तेथे श्रीराम मंदीर संस्थानचे गादिपती मंगेश महाराज यांच्या हस्ते गावगुढीचे पूजन करून उंच गुढी उभारण्यात आली.शोभायात्रेने वेधले लक्षशोभायात्रेच्या अग्रभागी पाठीवर भगवा ध्वज असलेला अश्व होता. त्यापाठोपाठ घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशातील बालके होती. त्यांच्या मागे ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करणारे विविध मंडळांचे कार्यकर्ते, मंगल वाद्य, त्यापाठोपाठ लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ व इतर ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषेत सहभागी बालक-बालिका, त्यासोबत विविध पंथ, संप्रदाय, संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ ६-७ मालवाहू रिक्षांवर शिवाजी महाराज,शनिपेठ पोलिसांकडून स्वागतया शोभायात्रेचे शनिपेठ पोलिसांकडून स्वागत करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी गुढीचे पूजन करून स्वागत केले. तसेच शोभायात्रेच्या मार्गावर भारत विकास परिषदेतर्फे स्टॉल लावून थंड दूध तसेच गुढी पाडव्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
श्रीराम मंदीर संस्थानतर्फे उभारली गावगुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:30 AM
भव्य शोभायात्रेने झाले नववर्षाचे स्वागत
ठळक मुद्देगायत्री मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभऐतिहासिक पुरूषांच्या वेशभूषेत सहभागी बालकांनी लक्ष वेधले विविध संघटनांचा समावेश