जळगाव : गॅस टॅँकरवर चालक असलेल्या रामदास देविदास बैरागी (५०, रा. वरणगाव, ता.भुसावळ, मुळ रा.खामगाव) यांचा एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये रात्री झोपेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.रामदास बैरागी हे मुळ खामगाव येथील रहिवासी असून हल्ली ते वरणगाव येथे पत्नीसह वास्तव्यास आहेत. गेल्या तीन वषार्पासून शितलसिंग सरदार यांच्या गॅस टॅँकरवर चालक होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी एमआयडीसीतील भारत गॅस कंपनीतून टॅकंरमध्ये गॅस भरला. त्यानंतर त्याच परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले. सहकाऱ्यांशी गप्पागोष्टी केल्यानंतर रात्री दहा वाजता झोपले. दरम्यान, मंगळवारी सकाळी क्लिनर बैरागी यांना उठविण्यासाठी आला असता त्यांच्या कडून काही एक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी अन्य चालकांना ही माहिती दिली. घटनास्थळी चालकांनी धाव घेत त्यांनी उठविण्याचा प्रयत्न केला असता रामदास यांच्याकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक बैरागी यांना जिल्हा रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा सूरज, सून तसेच विवाहित मुलगी पुजा असा परिवार आहे.
गॅस टॅँकर चालकाला हॉटेलमध्ये झोपेतच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 9:43 PM