शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

सायकलला वाचविताना गॅस टॅँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:57 PM

जळगाव : समोरुन येणाऱ्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस भरलेला टँकर निंबाच्या झाडावर धडकल्याची घटना रविवारी सकाळी ...

जळगाव : समोरुन येणाऱ्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस भरलेला टँकर निंबाच्या झाडावर धडकल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता महामार्गावर खेडी परिसरात घडली. या घटनेनंतर चालकाने पळ काढला. गॅस गळती किंवा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असता. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर टँकर चालक अन्वर फरार झाला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गॅस कंपनी गॅस भरलेले टॅँकर (क्र.एम.एच.४३ वाय ९८०१) मुंबई येथून नागपूर येथे जात असताना रविवारी सकाळी दहा वाजता खेडी गावानजिक महामार्गावर समोरुन सायकलस्वार येत होता. त्याला वाचविताना टॅँकर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे टॅँकर थेट निंबाच्या झाडाला धडकला व पलटी झाला. या घटनेनंतर गॅस गळतीच्या भीतीने चालक अनवर फरार झाला. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली.फरार चालकाला आणले शोधूनसहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी व चालक भूषण सोनार तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. टँकरची तपासणी करण्यासाठी एमआयडीसीती भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. स्थानिक अधिकारी मनोज वर्मा व सहकाºयांनी टॅँकरची तपासणी केली असता कुठेही गळती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर क्रेन मागवून टॅँकर उचलण्यात आले. फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी शोधून आणून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव