अर्पण लोढा,वाकोद, ता. जामनेर - अशिक्षीत असूनही एखाद्या प्रशिक्षित डॉक्टराप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती (बाळंतपण) करून प्रसंगी त्यांची काळजी घेणारी सुईन अर्थात दायी आज इतिहासात जमा झालेली आहे.‘शंभरात ऐन्शी सिझर’ होत असतांना ३५ वर्षात जवळपास हजारो नैसर्गिक प्रसूती करुन वाकोद येथील गीताबाई सपकाळे यांनी परिसरात बाळ व बाळंतिणींची नि:स्वार्थी मनाने त्यांनी सेवा करत सदैव आरोग्य सेवेचे व्रत जपले आहे. गीताबाईंनी तपासणी केली आणि बाळंतपणाची वेळ दिली तर त्यात अगदी तासाभराचाही फरक पडत नसायचा. असं तंतोतंत निदान त्या करीत. म्हणून परिसरातील महिलांच्या प्रसूतीसाठी त्या चांगल्याच प्रसिद्ध झोतात आल्या. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या सर्व प्रसुतीतील बाळ-बाळांतीण सुखरुप झाले आहेत. प्रसूती काळ म्हणजे महिलांच्या आयुष्यातील पुनर्जन्मच असतो. त्यांनी कधी कुणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही.आतापर्यंत त्यांनी चार हजाराच्या वर सर्व जाती-धर्मातील स्त्रियांचे सुखरूप बाळंतपण केले आहे. गीताबाई यांनी पंचक्रोशीत केलेले अनोखे कार्य कौतुकास्पद आहे.मुंबईत सनी आणि बॉबी देओलची देखभालघरची परिस्थिती हलाकीची असताना यापूर्वी गीताबाई सपकाळे उदरनिवार्हासाठी मुंबईत त्या जवळपास २०-२२ वर्ष वास्तव्यात होत्या. त्यावेळी गीताबाई यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या परिवारात मुंबई येथे गीताबाई सपकाळे यांनी तीन - चार वर्ष काम केले आहे. ज्या वेळी गीताबाई या धर्मेंद्र यांच्या कड़े काम करीत होत्या त्या वेळी सनी आणि बॉबी देओल अगदी लहान होते. या दोघांच्या आंघोळी पासून ते खाण्या पिण्या पर्यंत सर्व काम गीताबाईच पाहत होत्या.आज गीताबाई वाकोदला आपले आयुष्य घालवत असल्या तरी तत्कालीन आठवणीची तिजोरी आपल्या अंतकरणात जशाच्या तशा तेवत ठेवलेल्या आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या यांच्याशी देखील तेथे गीताबाईं यांची भेट झाली आहे.वाकोद व पंचक्रोशीत अल्पावधीतच दाई म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या व कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने कोणतेच शिक्षण न घेतलेल्या तसेच अशिक्षित गीताबाईंच्या कविता, ओव्या चांगल्या शिकलेल्यांना देखील लजवणाऱ्या आहेत.गीताबाई यांना आपल्या गावा बद्दल मोठी कळकळ आहे. त्या सलग १० वर्ष वाकोद गृप ग्रा.पं. च्या सदस्यदेखील राहीलेल्या आहेत. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांनी वाकोद गावासाठी केलेले काम पाहता वाकोद येथे झालेल्या ग्रामसभेतील विकासा वरील खालील कविता चांगलीच प्रसिद्ध झोतात आली होतीआलो फेडाया जन्मभूमीचं मी ऋणआई-बापाच्या लाभत्या पुण्यानंवाकोदचा विकास केलादारोदारी रोड भिडविलेबिन काठीचा आंधळा चालेनही लचक भरणार कमरालेसारं गाव चालतं आनंदानंआई-बापाच्या लाभत्या पुण्यानंआलो फेडाया जन्मभूमीचं मी ऋणआई-बापाच्या लाभत्या पुण्यानं..!
हजारो नैसर्गिक प्रसूती करणाऱ्या वाकोदच्या गीताबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:11 AM