आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : गीतांजली केमिकल्स कंपनीतील स्फोट प्रकरणी कार्यकारी संचालक सुरेंद्रकुमार मोहता व पवनकुमार देवरा या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला तर मोहता यांच्या पत्नी मधू सुरेंद्र मोहता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने मंजूर केला आहे. दरम्यान, गीतांजली केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.मधू मोहता यांनी नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता, तो संचालक मंडळाने डिसेंबर २०१७ मध्ये मंजूर केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. याशिवाय फॅक्टरी मॅनेजर जितेंद्र पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप इंगळे, शिफ्ट मॅनेजर श्रीकांत काबरा यांचाही नियमित जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या सर्व जणांनी न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.
जळगावातील ‘गीतांजली’ केमिकल्स कंपनीच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:35 PM
गीतांजली केमिकल्स कंपनीतील स्फोट प्रकरणी कार्यकारी संचालक सुरेंद्रकुमार मोहता व पवनकुमार देवरा या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला तर मोहता यांच्या पत्नी मधू सुरेंद्र मोहता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने मंजूर केला आहे. दरम्यान, गीतांजली केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.
ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निर्णयअन्य तिघांचाही नियमित जामीन फेटाळलास्फोटात पाच कामगारांचा झाला होता मृत्यू