स्टेशनबाहेर दिवसाही पोलिसांची गस्त
जळगाव : सध्या बहुतांश रेल्वे गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. स्टेशनच्या बाहेर चोरीच्या घटनांचे प्रकार घडत असल्यामुळे, चोरांना पकडण्यासाठी रेल्वेचे पोलीस स्टेशनाबाहेर साध्या वेशात गस्त घालत आहेत. तसेच प्रवाशांना आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहनही रेल्वे पोलिसांनी केले आहे.
ग्रामीण भागात जादा बसेस सोडण्याची मागणी
जळगाव : सध्या शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी दररोज येत आहेत. मात्र, बसेसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे या विद्यार्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.तरी आगार प्रशासनाने ग्रामीण भागात जादा बसेस सोडण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.
बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : नवीन बस स्थानकासमोर रस्त्यावरच बेशिस्त रित्य प्रवासी रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे वाहतुक कोंडी उद्भवत आहे. यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सिंग्रल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
जळगाव : सध्या शहरात अनेक ठिकाणी सिंग्रळ यंत्रणा बंद असल्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने शहरात सर्वत्र सिंग्रल यंत्रणा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.