जळगाव : घरकुल प्रकरणात सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने ७ वर्ष कैद व १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सुरेशदादा हे आधी ४ वर्षे ५ महिने कारागृहात होते. त्यामुळे हा कालावधी झालेल्या शिक्षेतून कमी होईल व उर्वरित कालावधी त्यांना कारागृहात रहावे लागणार आहे. दंडाच्याबाबतीत दंड भरला नाही तर आणखी वाढीव शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. सुरेशदादा जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक झाली तर २ सप्टेबर २०१६ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.जैन, देवकर, प्रा.सोनवणेंसह इतरांचे राजकीय भवितव्य धोक्यातया निकालामुळे माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह इतर नगरसेवकांचे राजकिय भवितव्य आता धोक्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला दोन वर्ष शिक्षा झालेली असेल तर अशी व्यक्ती निवडणुक लढविण्यास पात्र राहणार नाही.भाजपचे नगरसेवक भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, दत्तात्रेय कोळी, लता भोईटे आणि कैलास सोनवणे या पाच नगरसेवकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. माजी नगरसेविका पुष्पा प्रकाश पाटील यांना पाच लाख ८१ हजार रुपये रोख भरुन न्यायालयाने जामीन दिला आहे.२००५-०६ मध्ये मनपात आयुक्त असताना तत्कालिन नगरपालिकेत बेकायदेशीर कामे व अनियमितता आढळून आल्या. याबाबत कारवाई करणे हे आयुक्त या नात्याने माझे कर्तव्य होते आणि ते मी केले व पोलिसात स्वत:च तक्रार दिली. तपासाधिकाऱ्यांनीही चांगला तपास केला, त्याशिवाय सरकारी वकीलांनी सरकारची बाजू ठाम पणे मांडली. या गुन्ह्यात सर्व आरोपींना शिक्षा लागल्याने अधिकारी म्हणून काम केल्याचे समाधान लाभले.-डॉ.प्रवीण गेडाम, फिर्यादी, तथा तत्कालिन मनपा आयुक्ततपासाधिकारी म्हणून कुठल्याही त्रुटी न ठेवता अभ्यासपूर्ण व पारदर्शकपणे तपास केला. न्यायालयात सदोष दोषारोपपत्र सादर केले. आणि आज या खटल्यात सर्वच आरोपींना शिक्षा लागली. योग्य तपास व दोषारोपत्रामुळे एखाद्या गुन्ह्यात शिक्षा लागत असेल तर तपासाधिकाºयाचे तेच खरे समाधान आहे. या निकालाने मी समाधानी आहे.- इशू सिंधू, तपासाधिकारी तथा विद्यमान पोलीस अधीक्षक, अहमदनगर
‘घरकूल’ प्रकरण : सुरेशदादा जैन यांना भोगावी लागणार २ वर्षे सात महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:47 PM