शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

कोरोनाच्या संशयाची भुतं मानगुटीवर बसल्याने भाऊबंदकीत जावू लागले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 4:09 PM

कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात छोटेखानी वैवाहिक कार्यक्रमात न बोलावल्याच्या रागात होतेय मनोमनीखेदजनक चित्र दृष्टीक्षेपात

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : सद्य:स्थितीत सुरू असलेल्या छोटेखानी घरगुती विवाह सोहळ्यात निकटच्या भाऊबंद एखाद्या कोरोना बाधित रूग्णाचा जिवलग मित्र वा आप्तेष्ट असल्याच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसल्याने अघोषित बहिष्कार टाकण्याचे प्रकार वाढीस लागल्याने, कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे.अनलॉकमुळे सर्वसामान्य जनता अनावश्यक कारणाने रस्त्यावर उतरत असल्याने शहरी भागातून ग्रामीण भागातही कोरोनाने आपला पाय पसारल्याने शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना बाधित रूग्णांचा आलेख त्याच सरासरीने वर सरकू लागला आहे. परिणामी खेडेगावात प्रतिबंधित क्षेत्र सीलबंद करताना प्रशासकीय लवाजमा व पोलीस असे चित्र पाहताच कोरोनासंबंधीची भीती ग्रामीण जनतेच्या मनात घर करू लागली आहे.परिणामी प्रतिबंधित क्षेत्रात वा गावात अन्य कुणी कोरोना बाधिताच्या संपर्कात आहे का? याचा समाजमनात उहापोह होऊ लागताच जो तो आत्मपरीक्षण करून, स्वत:ची चाचपणी करत अंगावरची कातडी काढण्याचा प्रयत्न करतानाचे चित्र दिसून येते. किंबहुना, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेत आपुलकीची भावना दृढ असल्याने व मैत्रीसंबंध, नातेसंबंध, नित्याचा संपर्क या बाबी जनसामान्यांच्या डोळ्यासमोर राहत असल्याने कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती प्रशासनासमोर येत नसला तरी, समाजमनाची त्यावर वक्रदृष्टी असते.कोरोनाचे सावट पुढील वर्षांत असेच कायम राहिल्यास पुढच्या वर्षीही छोटेखानी घरगुती विवाह करण्याचा प्रसंग उद्भवणार असल्याने ‘कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर’ असे म्हणत शुभमंगल विवाहाच्या सनई चौघडा आता घरातल्या घरात मोठ्या प्रमाणात वाजू लागले आहे. त्या अनुषंगाने कोरोना बाधित वा संशयित रुग्ण आपल्या या छोटेखानी समारंभात सहभागी होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. यातूनच भाऊबंदकीत अशा संशयित रुग्ण वा व्यक्तीचा समावेश असला तर, त्याला टाळण्यासाठी निमंत्रणाचे वरकरणी पण अवमानास्पद सोपस्कार पार पाडून त्यास पूर्णत: टाळण्याचा यथोचित प्रयत्न केले जातात. संबंधित व्यक्तीला त्या अघोषित बहिष्काराची भनक लागली म्हणजे तो आपल्या अपमानाची आग शांत होत नाही तोपर्यंत ते किल्मिष मनात संचित करून ठेवत असल्याने भाऊबंदकीत कोरोनामुळे तडा जाऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर