शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

घुसर्डी येथील शेतकऱ्यांची केळी इराण देशात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:12 AM

घुसर्डी येथील शेतकरी गोकुळ कपूरचंद परदेशी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात केळीच्या तीन हजार खोडांची लागवड केली आहे. या ...

घुसर्डी येथील शेतकरी गोकुळ कपूरचंद परदेशी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात केळीच्या तीन हजार खोडांची लागवड केली आहे. या सर्व केळींचा माल निघेपर्यंत साधारण एक ते दीड लाख रुपये खर्च झालेला आहे. तर केळी पिकातून संपूर्ण खर्च वजा करून त्यांना आठ लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. स्थानिक बाजारभावापेक्षा तब्बल २०५ रुपये जास्त भाव त्यांना मिळाला आहे.

कधी काळी संपूर्ण राज्यात नव्हे; तर देशात कजगाव व परिसरातील केळ्यांना विशेष महत्व होते. मात्र, कधी बाजारात भाव मिळाला नाही तर कधी निसर्गाने साथ दिली नाही. अनेक वेळा शासनाची उदासीन भूमिका. ही केळी लागवडीत घट होण्यास कारणीभूत ठरली. असे काळानुरूप अनेक बदल झाले. त्यामुळे कजगाव परिसरातील केळीच्या खोडांची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. मात्र, परदेशी यांनी केलेला यशस्वी प्रयोग आता अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. गोकुळ परदेशी यांना या केळी लागवडीसाठी कृषितज्ज्ञ राकेश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. गिरणा काठावर शेतकऱ्यांनी केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरूच ठेवलेली आहे. मोठ्या कष्टाने केळीचा बगीचा फुलवत अनेक शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. यापूर्वीही वाडे, वडधे, पथराड यांसह काही गावातील शेतकऱ्यांनी आपला केळीचा माल इराण व अफगाणिस्तानला दिला आहे. बाजारपेठेतील खासगी व्यापारी केळी मालाला देत असलेल्या भावापेक्षा जादा भाव देत आहेत.

-----

प्रतिक्रिया — काही वर्षांपूर्वी कजगाव परिसरातील केळ्यांना विशेष महत्व होते. मात्र, जसजसा काळ पुढे जात राहिला तसतसे कजगावच्या केळ्यांचे महत्व कमी होत गेले. शासनासह निसर्गानेही साथ दिली नाही. त्यामुळे आम्ही नवीन प्रयोग करून थेट इराण या देशातील बाजारात केळी पाठवली आहेत. येथील स्थानिक बाजारभावापेक्षा इराणमध्ये चांगला भाव मिळाला आहे. गोकुळ कपूरचंद परदेशी, केळी बागायतदार शेतकरी, घुसर्डी, ता. भडगाव

प्रतिक्रीया — केळी लागवड वाढावी म्हणून शासनाने केळ्यांना फळाचा दर्जा द्यावा. केळ्यांना हमीभाव देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे. त्यामुळे कजगाव व परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा सुगीचे दिवस येतील व केळी लागवडीत मोठा बदल होईल.

राकेश थोरात, कृषितज्ज्ञ, कजगाव.