जि. प.त बैठका
जळगाव : जिल्हापरिषदेत मंगळवारी विविध विभागांच्या आढावा घेण्यासाठी बैठका पार पडल्या. यात गेल्या दोन दिवसात मोठ्या बैठका होणार असल्याने विभागप्रखांकडून एकत्रीत आढावा घेतला जात आहे. यात दिवसभर अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.
वाहतूक कोंडी
जळगाव : जिल्हा परिषदेसमोर एक मालवाहू रिक्षा आडवी लावण्यात आल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बराच वेळ वाहने अडकून होती. शिवाय पुढेच काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बोदवडला रुग्ण वाढले
जळगाव : बोदवड तालुक्यात ॲन्टीजन तपासणी चार बाधित रुग्ण आढळून आले असून सक्रीय रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण कमी असल्याने बोदवड कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र असताना अचानक चार रुग्णांची भर पडली आहे.
३४ जण झाले बरे
जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर ३४ जणांना घरी सोडण्यात आले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५४८४६ वर पोहोचली असून हे प्रमाण ९६. ७५ झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी रुग्ण अधिक व बरे होणारे कमी असे चित्र असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.
मेडिसीनची बैठक
जळगाव : महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांची संख्या वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषध वैद्यक शास्त्र विभागाची बैठक पार पडली. या योजनेसंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन व रुग्णांची यात नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.