शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 1:39 PM

फडणवीसांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रियेवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे. 

मुंबई/जळगाव - कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवानंतरही भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील विजयावर भाष्य केलं. तसेच, आम्ही महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालो तरी, काहींना वाटतं आता देशात सत्ताबदल होईल. मात्र, कर्नाटकमधील भाजपला मिळालेली मतं हे टक्केवारीच्या तुलनेत कमी झालेली नाहीत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या निकालांचं विश्लेषण करताना भाजपची बाजू मांडली. आता, फडणवीसांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रियेवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे. 

भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येत नव्हत्या. किंबहुना आता जरी साउथ इंडियामधील राज्यांमध्ये पाहिलं तरी तिथेही भारतीय जनता पार्टीला फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पार्सल परत पाठवले म्हणायचं का? असे म्हणत एकनाथ खडसेंनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. फडणवीसांनी कर्नाटक निवडणुकींच्या प्रचारावेळी राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवा, असे म्हणत टीका केली होती. 

शेवटी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करतच असतो, भारतीय जनता पार्टीचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेल्याचे शेकडो उदाहरणे आहेत. भारतीय जनता पार्टीची आजमित्तीस खूप नाजूक परिस्थिती झालेली आहे, गिरा तो भी टांग उपर अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य दिसत आहे, असा टोलाही खडसेंनी यावेळी लावला. फडणवीसांनी कर्नाटक निवडणुकांचे विश्लेषण करताना भाजपची बाजू आणि मिळालेल्या मतांची टक्केवारी सांगितली होती. त्यावरुन, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.   

कर्नाटक मध्ये काँग्रेसला यश मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष आहेत त्यांना यश मिळाले. म्हणजेज, भाजपच्या विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे, देशभरामध्ये विरोधी पक्ष एकत्र राहिला तर बऱ्यापैकी यश मिळू शकेल, हा विश्वास वाढत आहे, आता दहा वर्षभरामध्ये आपण जे चित्र देशात पाहिलं, यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, असेही खडसेंनी म्हटलं. 

१७ तारखेला राष्ट्रवादीची बैठक

कर्नाटकच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे. त्यामुळे, भावी कालखंडातील लोकसभा या एकत्र लढाव्यात याविषयी आज होत असलेल्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. १७ तारखेलाही राष्ट्रवादीची बैठक आहे, त्या बैठकीच्या अनुषंगाने ही या बैठकीत चर्चा होईल, आणि १७ तारखेच्या बैठकीला मी उपस्थित राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकJalgaonजळगाव