चाळीसगाव, जि.जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे जिल्ह्याचे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी चाळीसगाव येथे मंगळवारी दुपारी सभेत केली.चाळीसगाव येथील वंचित बहुजन आघाडीच उमेदवार मोरसिंग राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.ते म्हणाले, अजिंठा, वेरुळ या पर्यटनस्थळाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. या पर्यटनस्थळासाठी जपान सरकारने निधी दिला होता. या पर्यटनस्थळाचा विकास झाला असता तर जळगाव व औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वाधिक विकास झाला असता. परंतु या पर्यटनाला चालना मिळू शकली नाही. या राज्यकर्त्यांचे डोके फक्त वाळू तस्करीत अडकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.जळगाव जिल्हा हा शुद्ध सोन्याच्या बाबतीत अव्वल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांची बाजारपेठ विश्वासास पात्र आहे. त्यामुळे या जिल्ह्याला देशात अतिशय महत्व आहे. या भांडवलाचा योग्य वापर केला असता तर जळगाव हे देशातील सर्वात मोठे माकेर्टींग केंद्र होऊ शकले असते. दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिल्यास जळगाव हे देशाच्या नकाशावर विकसीत गाव करणार असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली.व्यासपीठावर जळगावचे शफी शेख, जळगाव ग्रामीणचे रवी देशमुख, पाचोऱ्याचे नरेश पाटील, संभा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गिरीश महाजन प्रसिद्धीपटू, अंत्ययात्रेला गेले तर तेथेही सेल्फी काढतील : अॅड.प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 6:52 PM
पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ठळक मुद्देचाळीसगाव येथील प्रचार सभेत अॅड.प्रकाश आंबेडकर यांची टीकाराज्यकर्त्यांचे डोके फक्त वाळू तस्करीत अडकले