पाचोरा-राजकीय क्षेत्रातील कुठल्याही व्यक्तीने कितीही चांगले काम केले असेल तरी प्रसारमाध्यमे त्यांना जितकी प्रसिद्धी देत नाहीत त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी ही त्या व्यक्तीकडून झालेल्या एका चुकीला देतात. अशाच प्रकारे सेल्फीच्या एका चुकीचे फळ सध्या गिरीश महाजन हे अनुभवत असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे सांगितले.पाचोरा येथे एका कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पूरग्रस्तभागात होडीमध्ये ही सेल्फी जलसंपदा मंत्री महाजन यांनी काढल्यावर त्यांच्यावर टिका झाली, यासंदर्भात खडसे म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी केवळ राजकीय क्षेत्रालाच प्राधान्य न देता सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व क्षेत्रांना स्पर्श करून चतुरस्र बनावे असे आवाहन देखील केले.यावेळी व्यासपीठावर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, डॉ. भूषण मगर, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, पंचायत समितीचे सभापती बन्सी पाटील, अशोक लाडवंजारी , बसपचे अनिल महाजन आदी उपस्थित होते. सचिन चौधरी, सचिन पाटील, भुवनेश दुसाने, रुचिता चौधरी, एकनाथ चव्हाण, स्वप्निल कुमावत, प्रतिक महाजन, विकास बिºहाडे, कुणाल सोनार, प्रशांत पाटील, सचिन सोपे, शुभम सोनवणे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
गिरीष महाजन अनुभवत आहेत एका सेल्फीच्या चुकीची फळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 9:07 PM