अजय पाटील,आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ - केंद्रिय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सुरु केलेल्या फीटनेस चॅलेंज मोहीमेत अनेक दिग्गजांनी आपला सहभाग घेतला असून, राज्याचे जलपसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या मोहीमेत भाग घेवून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व महाजन यांचे क ट्टर विरोधक एकनाथराव खडसे यांना फिटनेसचे चॅलेंज दिले आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी दिलेले चॅलेंज एकनाथराव खडसे स्विकारतील का ? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
गिरीश महाजन हे आपल्या फिटनेसबाबत जागृत मोठ्या प्रमाणात जागृत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील क्रीडा मंत्र्यांचा मोहीमेत सहभाग घेवून आरोग्याबाबत सजग राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. गिरीश महाजन यांनी पुशअप करतांनाच व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यासह खडसेंना पुशअप किंवा चालण्याचे आव्हान दिले आहे. गेल्या काही वर्षभरापासून गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. याचा प्रत्यय भाजपाच्या अनेक बैठकांमध्ये पहायला मिळाला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या या फिटनेस आव्हानाला महत्व प्राप्त झाले आहे. खडसेंना या आव्हानाबाबत विचारले असता, याबाबत त्यांनी आपण ही बातमी किंवा व्हिडीओ पाहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजनांनी फिटनेस संदर्भात आव्हान दिले आहे. निरोगी शरिरासाठी सर्वांनी सजग राहणे चांगले आहे.-एकनाथराव खडसे, माजी मंत्री
सर्वांनी आरोग्याबाबत सजग रहायला हवे. आरोग्य ही एक संपत्ती असून त्याचे जतन केले पाहिजे. मी नेहमी व्यायामावर भर दिला असून, माझ्या सहकाºयांना देखील व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. सध्या सुरु असलेल्या मोहीमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे यांच्यासह इतर मंत्र्यांना देखील आरोग्याबाबत सजग राहण्याबाबत सांगितले आहे.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री,