जळगाव : भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना हा वाद भाजप-सेनेतील अंतर्गत बाब असून सेनेलाही या पदावर दावा करण्याचा अधिकार आहे. कदाचित अडीच-अडीचवर्ष ते हे पद वाटूनही घेतील. मात्र त्यासाठी पुन्हा सत्तेत येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. गिरीश महाजन यांनी जनतेला गृहित धरु नये, असा टोला त्यांनी मारला.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदार संघातून राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी बुधवार, २४ जुलै रोजी ते जळगावात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.गिरीश महाजनांनी जनतेला गृहित धरू नयेगिरीश महाजन यांनी जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला भुईसपाट करू असे विधान केले आहे. नियोजन समितीच्या बैठकीत राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याशी त्यांची या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली. याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जनतेला गृहित धरून चालत नाही. जनता-जनार्दनच सर्वकाही आहे. जनता काहीही करू शकते. तसेच लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत फरक आहे. विधानसभेसाठीचे प्रश्न वेगळे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कर्जमाफी झालेली नाही. त्याचे पडसाद मतदानातून निश्चित उमटतील.पक्षातील नेत्यांच्यामते लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयास्पद आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच विधानसभा निवडणुक घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र निवडणूक आयोग दखल घ्यायला तयार नाही. त्याचा पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल का? असे विचारले असता वळसे पाटील म्हणाले की, लोकसभेच्यावेळी देशात लोकमत हे सरकारविरोधी होते. लोकांनी मत देऊन निवडून देण्याआधीच सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून आधीच किती जागा मिळतील? याचा आकडा जहीर झाला. म्हणून सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. त्यामुळेच देशात व राज्यातही निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी बॅलेटपेपरवरच मतदान घेण्याची मागणी आहे. पक्षही त्यासाठी आग्रही आहे. मात्र जरी निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली नाही, तरी कार्यकर्ते मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागृत झालेले आहेत. त्यामुळे ते सर्व परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज आहेत.जिल्ह्यात उत्साही वातावरणआधी पालिका, मनपा व नंतर लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जिल्ह्यातील पक्षासाठीचे वातावरण कसे आहे? याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात उत्साह आहे. कार्यकर्ता खचलेला नाही. लढाई करण्याची त्याची तयारी आहे. परिस्थितीशी सामना करण्याची तयारी आहे.मतदारसंघांची अदलाबदल शक्यआघाडी होण्यापूर्वीच राष्टÑवादीकडून सर्वच मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असल्याबद्दल विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यात सर्वच मतदार संघातून ५६ इच्छुकांचे अर्ज आले. त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशस्तरावरील कोअर कमिटीकडे याबाबतचा निर्णय सोपविला जाईल. मात्र काँग्रेस व मित्रपक्षांशी आघाडीबाबत चर्चा सुरू असून आघाडी झाल्यास मतदार संघांची अदलाबदलही होऊ शकते, असे सांगितले.आघाडीबाबतचा निर्णय पक्षाची कमिटी घेणारस्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्टÑवादीने मनसे, वंचितला सोबत घेतले तरच आघाडीसोबत येणार असल्याचे विधान केले असल्याबाबत विचारणा केली असता वळसेपाटील म्हणाले की, आघाडीबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. पक्षाने त्यासाठी कमिटी केली असून त्यावर मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.
गिरीश महाजन यांनी जनतेला गृहीत धरू नये - दिलीप वळसे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 1:02 PM