जळगाव : कपडे व खाद्यपदार्थाचे आमिष दाखवून राजस्थानातून पळविलेल्या १३ वर्षीय मुलीची रेल्वेतील प्रवाशी व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुटका झाली आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. अपहरणकर्त्याने मुलीच्या कुटुंबाशी जवळीक साधून ‘मी तुझा मामा आहे ना, चल मग फिरायला जाऊ’ अशी बतावणी करून तिच्या भावास चकमा देत मुलीला पळवले होते. गेल्या ९ दिवसापासून त्याने मुलीला विविध राज्यात फिरविल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून अपहरणकर्ता मात्र फरार झाला आहे.लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आजमगड, ता.सादूल, जि. गंगानगर (राजस्थान) येथून १५ फेब्रुवारी रोजी हा मुलीचे अपहरण झाले आहे. सादूल पोलीस स्टेशनला या गुन्ह्याची नोंदही झाली आहे. दिलीपकुमार सोनू भागाराम (वय ३२ रा.भागसर, जि.फाजिल्का हा गेल्या काही दिवसापासून या मुलीच्या कुटूंबाच्या संपर्कात आला होता.गोड बोलून त्याने कुटुंबातील सदस्यांचे मन जिंकले. १५ फेब्रुवारी रोजी आपण बाहेर फिरायला जावू असे म्हणत कपडे व खाद्य पदार्थाचे आमिष दाखवून मुलीला घेऊन घराबाहेर पडला. यावेळी बालिकेचा मोठा भाऊदेखील दोघांच्या सोबत गेला.परंतु भावास बाजारात सोडून दिलीपकुमार याने मुलीसह पोबारा केला. मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी तिच्यासह त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची निराशा झाली. अखेर सादूल शहरातील पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार दिलीपकुमार याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.स्टेशनवर गाडी थांबताच काढला पळ नेतलेकर व अन्य प्रवाशांनी दिलीपकुमार पकडून ठेवले तर दुसरीकडे मुलीचे तिच्या पालकांशी मोबाईलवरुन बोलणे करुन दिले.विखरण स्टेशनवर पॅसेंजर थांबताच दिलीपकुमार याने दोघा प्रवाशांना चकमा देत पलायन केले. दरम्यान, मुलगी सुरक्षित असल्याचे कळताच तिच्या काकांनी तत्काळ सादूल पोलिसांना माहिती दिली. त्यांनी नेतलेकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेत भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.त्यानुसार जळगावचे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. पडघान, जगन्नाथ सरोदे, योगेश चौधरी, हिरालाल चौधरी, रामराव इंगळे, महिला पोलीस विजया जाधव यांनी शुक्रवारी रात्री नेतलेकर यांच्याशी संपर्क साधून आठ वाजता रेल्वे स्थानकावर मुलीला उतरविले व रात्रभर बालनिरीक्षक गृहात ठेवले.शनिवारी दुपारी राजस्थान पोलीस व मुलीचे काका आल्यानंतर कागदोपत्री पूर्तता करुन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.काकांना पाहताच मुलगी झाली आनंदीतबालिकेचे काका गुरमितसिंग व राजु,सदूलचे सरपंच कुलदीपसिंग, राजस्थानचे पोलीस जळगावच्या बालनिरीक्षणगृहात दाखल झाले असता काकांना पाहताच मुलगी आंनदीत झाली व त्यांच्याजवळ गेली. पालकांचे जबाब घेतल्यावर रेल्वे पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले.दुपारी ते सर्वजण राजस्थानकडे मार्गस्थ झाले. मुलीला मारहाण झाल्याने फुटले बींगअपहरणकर्ता शुक्रवारी सुरत भुसावळ-पॅसेंजरमधून मुलीला घेऊन प्रवास करत होता. यावेळी मुलीने घरी जाण्याचा तगादा लावला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दोंडाईचा येथे गाडी थांबल्यावर पुन्हा मुलीने घरी जाण्याचा आग्रह धरल्यावर दिलीपकुमारने तिला मारहाण केली. त्यावेळी संजय नेतलेकर यांनी त्या मुलीला विचारणा केल्यावर मुलीने आपबिती कथन केली. दिलीपकुमारने यापूर्वीही केले अपहरणदिलीपकुमार याने यापूर्वी सादूल गावापासून काही अंतरावरावरील एकागावातून दोन मुलांचे अपहरण केले होते. यानंतर त्याला नांदेड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरूध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. राजस्थान पोलीस त्याच्या शोधात आहेत. या गुन्ह्यातही तीन पथके महाराष्टÑ, गुजरात व मध्यप्रदेशात रवाना झाली होती.
राजस्थानातून पळवून आणलेल्या मुलीची रेल्वे स्टेशनवर सुटका
By admin | Published: February 26, 2017 12:08 AM