सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व संशयित मुलगा दोघंही रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहेत. पीडित मुलीचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या शिक्षण न करता आईला घरकामात मदत करते, ऑगस्ट २०२० मध्ये मैत्रिणीमार्फत पीडित मुलीची एका १७ वर्षीय मुलासोबत ओळख निर्माण झाली. त्यांची ओळख झाल्यानंतर दोघांचे भेट होऊन बोलणे सुरू झाले. त्यातून ऑगस्ट महिन्यात संशयित हा पीडितेला कोल्हे हिल्स परिसरात घेऊन गेला व आपण लग्न करू असे सांगितले असता, मी अजून लहान आहे, असे पीडितेने सांगितले. त्यावेळी त्याने बांधकामाच्या जुन्या घरात शारीरिक संबंध केले व नंतर घरी सोडून दिले. पुन्हा आठवड्याने त्याच जागी नेऊन शारीरिक संबंध केले व घरी सोडून दिले. सप्टेबर महिन्यात त्याने सात ते आठ वेळा शारीरिक संबंध केले. एकदा मला महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स परिसरातील नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत अंगलट केले. तिने नकार दिल्यावर भावाला मारून टाकण्याची दमदाटी केली व तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडित गर्भवती राहिली. याबाबत तिने मुलाला सांगितले असता पीडितेला ठार मारण्याची धमकी देऊन मला पुन्हा भेटू नको, अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार पीडितेने आई व वडिलांना सांगितला. त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार विश्वनाथ गायकवाड व अतुल सोनवणे यांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन प्रेमप्रकरणातून मुलगी गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:27 AM