शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 8:55 AM

जळगावमधील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव: जळगावमधील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सख्खी मुलगी व पुतण्याने संगनमताने छातीत सुरा खुपसून ५२ वर्षीय इसमाची हत्या केली. येथील सुभाषचंद्र बोस नगरात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगर बसथांब्यापाठीमागे सुभाषचंद्र बोस नगरात गुलाब यादवराव रावणचवरे वास्तव्यास होते. त्याचा मटका विक्रीचा व्यवसाय होता.

संबंधित घटना ही मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोस नगर परिसरात घडली आहे. मृतक ५२ वर्षीय गुलाब रावणचवरे यांनी आपल्या लक्ष्मी नावाच्या मुलीचं तीनवेळा लग्न करुन दिलं. पण मुलगी तरीही संसार करत नसल्याने गुलाब नेहमी तिच्यावर रागवत होते. लक्ष्मी तिसऱ्यांदा जेव्हा संसार मोडून घरी आली तेव्हा तिच्या पित्याने तिला घरात घेण्यास नकार दिला.

मुलगी लक्ष्मी आणि वडीलांमध्ये मोठा वाद झाला. यादरम्यान बुधवारी रात्री गुलाब रावणचवरे हा दारुच्या नशेत घरात खुर्चीवर बसलेला होता. त्यावेळी त्याची मुलगी लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे (१९), पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (२८) रा.बहापूरा या दोघांनी संगनमताने गुलाबच्या छातीवर धारदार सुऱ्याने सपासप वार केले.

जबर रक्तस्राव झाल्याने गंभीररीत्या जखमी झाला. घटनेच्या काही वेळानंतर गुलाब रावणचवरे याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच डीवायएसपी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा प्राथमिक तपास सपोनि विश्वजित ठाकूर, पो.काँ.प्रमोद राठोड, पो.काँ.कैलास पवार यांनी करुन आरोपी लक्ष्मी सनिसे व प्रकाश रावणचवरे या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि रतनसिंह बोराडे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस