जळगाव : आर्थिक गर्तेतील महापालिकेचे केवळ पाणीपट्टीची दोन कोटींच्या जवळपास थकबाकी शासकीय कार्यालयाकडे आहे. पाणी पुरवठा करणाºया गिरणा पाटबंधारे विभागाकडे ११ लाखांची तर पोलीस प्रशासनाकडेही लाखोंची बाकी असल्याचेच लक्षात येत आहे. त्यामुळे ‘गिरणा’ने रोखले ‘वाघूर’चे ११ लाख अशीच परिस्थती दिसून येत आहे. शहरात पूर्वी पाणी पुरवठ्यांची समस्या ही गंभीर होती मात्र वाघूर पाणी पुरवठा योजना झाल्यापासून पाणी पुरवठा उन्हाळ्यात व दुष्काळाच्या काळातही सुरळीत झाला. पाणी पुरवठ्यात तोटाचमहापालिकेचे दरडोई, दर दिवशी १३५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत जलवाहिन्यांची पूर्तता व अन्य काही अडचणींमुळे सद्य स्थितीत दररोज पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. पाणीपट्टीचा विचार करता मनपा घरगुती अर्धा इंची नळ कनेक्शन असल्यास मालमत्ताधारकाकडून दोन हजार पाणीपट्टी आकारते. हेच दर व्यावसायिक नळ संयोजन असल्यास वर्षाला ७ हजार १६०, झोपडपट्टी भागात एक हजार व शासकीय कार्यालये तसेच कर्मचारी वसाहतींसाठी वर्षाला दोन हजार असे दर निश्चित करण्यात आले आहे. पाणी पट्टीतून मनपास मिळणारे उत्पन्न व त्यावर होणाºया खर्चाचा ताळमेळ लक्षात घेता मनपास भुर्दंडच सोसावा लागत असतो. मात्र एक अत्यावश्यक नागरी सेवा म्हणून मनपा हा भूर्तंडही सोसते. तरीही अनेकांकडून पाणी पट्टी भरण्यात टाळाटाळ होत असून यात शासकीय कार्यालयेही आघाडीवर आहेत. शासकीय कार्यालयाकडील थकबाकीसाठी सतत पाठपुरावा सुरू असतो. या कार्यालयांकडे पाणीपट्टीसाठीचे अनुदान शासनाकडून मिळत असते. ते मिळाल्यावर बरेच विभाग पैसे देतात. त्यासाठी पाठपुरावा करावा असेही आम्ही कळवत असतो. थकबाकी वसूल झाल्यास मनपाला आर्थिक हातभार लागेल.-जीवन सोनवणे, आयुक्त मनपा. ही तर हतबलता...शहरात महापालिकेचे चार प्रभाग समिती कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या अंतर्गत येणाºया विविध शासकीय कार्यालयाकडे थोडीथोडकी नव्हे तर जवळपास दोन कोटी एवढी प्रचंड थकबाकी असल्याचा मनपा प्रशासनाकडे अहवाल आहे. एखाद्या नागरिकाने थकबाकी केली की मनपा त्याचे नळ कनेक्शन बंद करते मात्र येथे काही ठिकाणची थकबाकी ही वर्षानुवर्षे असताना त्याकडे दुर्लक्ष करून हतबलताच दाखविली जात आहे. पोलीस, गिरणाकडे जास्त थकबाकीमनपाच्या प्रभाग समिती एक अंतर्गत जवळपास १२ शासकीय कार्यालये, कर्मचाºयांची निवास्थाने येतात. या विभागांकडे पाणीपट्टीची १७ लाख ४ हजार ६५९ एवढी मोठी थकबाकी आहे.सर्वाधिक थकबाकी ही कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभागाकडे ११ लाख ८ हजार ४३२ एवढी आहे. जिल्हा क्रीडा संकुलाकडे ती ४ लाख १२ हजार एवढी आहे.पोलीस लाईन (बॉम्बेडार्इंग) कडे १५ लाख ५० हजार.चिमुकले राममंदिर पोलीस लाईन ४ लाख ५९ हजार. मशिदीजवळील पोलीस लाईन ४५ लाख ९० हजार एवढी थकबाकी आहे. या प्रभागाकडे शासकीय कार्यालयांची थकबाकी ही जवळपास १ कोटींवर आहे. प्रभाग समिती दोन अंतर्गत मुख्य पोस्ट आॅफीस, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सिंधी कॉलनी या दोन विभागांकडे ६० हजारांची थकबाकी आहे. प्रभाग समिती तीन अंतर्गत महावितरण, सामाजिक न्याय भवन, लघू पाटबंधारे, तलाठी कार्र्यालय मेहरूण, बांधकाम विभागाकडे ३ लाख २४ हजार ६५४ रूपयांची थकबाकी आहे.प्रभाग समिती क्रमांक ४ अंतर्गत येणाºया विविध शासकीय कार्यालयाकडे ५६ लाख ५९ हजार ५ हजार ९४४ एवढी थकबाकी असल्याचा अहवाल आहे.
‘गिरणा’ने रोखले ‘वाघूर’चे ११ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:51 AM