आॅनलाईन लोकमतधरणगाव, दि.२६ : तालुक्यातील हिंगोणा रस्त्यावरील रस्तालुट व पिंप्री येथील दुचाकी चोरीप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अनंत उर्फ बटाट्या एकनाथ वानखडे (रा.हतनूर,ता.भुसावळ) याला अटक केली आहे. संशयित आरोपीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून पोलिसांनी एक दुचाकी हस्तगत केली आहे.बटाट्या उर्फ अनंत याने ३१ आॅगस्ट रोजी पिंप्री येथून शांतीलाल भोगीलाल पाटील (रा.पिंप्री) यांची दुचाकी चोरी केली होती. ही दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. तसेच सातपूर नाशिक पोलीस स्टेशन हद्दीतून पल्सर गाडी चोरल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने १ सप्टेंबर रोजी पिंप्री येथून हिंगोणा जाणाºया रमेश परशुराम पाटील (रा.हिंगोणा बुद्रुक) यांच्या दुचाकीला लाथ मारून रस्तालुट केली होती. या गुन्ह्यात त्याने सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दोन हजार आठशे रुपये लुटले होते. पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे, हवालदार मोती पवार यांनी आरोपीला अटक केली. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत आहे. त्याने अन्य ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तपास हवालदार मोती पवार करीत आहेत.
धरणगाव पोलिसांनी केला रस्तालुटीतील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 6:02 PM
दोन दुचाकी चोरीची कबुली : धरणगाव पोलिसांनी केली एक दुचाकी हस्तगत
ठळक मुद्देसातपूर नाशिक पोलीस स्टेशन हद्दीतून पल्सर गाडी चोरल्याची कबुलीपिंप्री रस्त्यावरील रस्तालुटीत सहभागधरणगाव पोलिसांनी चोरीची दुचाकी हस्तगत