शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

केसपेपर देण्यापासून ते अ‍ॅडमिटपर्यंतची माहिती देताना नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:13 AM

जळगाव : विविध व्याधींसंबंधित उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात नागरिक येतात़ रुग्णालयात शिरताच... पहिला संबंध येतो, तो केसपेपर ...

जळगाव : विविध व्याधींसंबंधित उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात नागरिक येतात़ रुग्णालयात शिरताच... पहिला संबंध येतो, तो केसपेपर विभागाशी. जिल्हाभरातून नागरिक येत असल्यामुळे केसपेपरसाठी सकाळपासून रांगच लागते़ त्यांचे नाव, पत्ता, वय लिहून त्यांना काय तपासणी करावयाची आहे, याबाबत विचारून संबंधित ओपीडी कक्ष सांगितला जातो. दिवसभरात सुमारे ४०० नागरिकांना मार्गदर्शन करता-करता नाकीनऊ येते़ काही वेळेस अनेक जण वादही घालतात. त्यामुळे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून त्या व्यक्तीशी बोलावे लागत असल्याचा अनुभव जिल्हा रुग्णालयातील केसपेपर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.

‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी जिल्हा रुग्णालयातील केसपेपर विभागातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन कामाची माहिती व त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. सकाळी ८ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री ८ या दोन बॅचमध्ये केसपेपर विभाग सुरू असतो. दररोज तीन-तीन कर्मचारी त्या ठिकाणी ड्यूटी बजावतात. जिल्हाभरातून नागरिक त्यांच्या व्याधींचा उपचार करण्यासाठी येतात़ त्याआधी केसपेपर काढतात़ त्यामुळे कधी-कधी प्रचंड गर्दी होते. काही वेळेस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशीही संपर्क होतो. मात्र, त्या रुग्णाच्या संपूर्ण शंकांचे निरसन करून संबंधित विभागात पाठविले जाते, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

नियमित मास्कचा वापर

दररोज ४०० तर दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्राच्या दिवशी सुमारे ८०० व्यक्तींशी केसपेपर काढताना संपर्क येतो. त्यात त्यांना नाव, पत्ता, वय विचारले जाते़ कधी मोठी रांग असली तर त्यांना शिस्तीत उभे राहण्यासाठी सूचना केल्या जातात. त्यावेळी गळादेखील दुखतो़ केसपेपरपासून ते अ‍ॅडमिट करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे स्वत:लासुद्धा आरोग्याचा धोका असतो. त्यामुळे नियमित मास्क आणि हॅण्डग्लोजचा वापर केला जातो, असेही कर्मचाऱ्यांनी अनुभव सांगितले.

घरी आल्यावर पाल्यांपासून थांबतो दूर

स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने रोज ड्यूटी संपली की घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करतो. घरात मुले असून, त्यांच्याशी दूर राहतो़ ही खबरदारी राखत असल्यामुळे कुणाच्याही आरोग्यावर परिणाम झालेला नाही, असे केसपेपर काढणारे कर्मचारी विलास वंजारी यांनी सांगितले.

मानसिकता बघून बोलतो

केसपेपर उशिरा मिळाला की, काही लोक आरडाओरड करतात तर काही वाद घालतात़ त्यामुळे समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून त्याला सांभाळले जाते. नंतर त्याची समजूत घातली जाते. जोपर्यंत त्या व्यक्तीचे समाधान होत नाही. तोपर्यंत मार्गदर्शन केले जाते. दिवसभरात शेकडो नागरिकांना मार्गदर्शन करताना चांगलाच कस लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. त्याचबरोबर रुग्णालयात वेळेवर येणे ही अपेक्षा आहे.

- विलास वंजारी, कर्मचारी, केसपेपर विभाग, जिल्हा रुग्णालय